Jai Bhim Panther Ek Sangharsh Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Jai Bhim Panther Ek Sangharsh Announcement: ‘जयभीम पँथर एक संघर्ष’ची कथा रुपेरी पडद्यावर दिसणार, चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

Jai Bhim Panther Ek Sangharsh Motion Poster: बहुजन तरुणांना नवी दिशा देण्यासाठी आणि समाज प्रबोधनासाठी एका नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.

Chetan Bodke

Jai Bhim Panther Ek Sangharsh Announcement

बहुजन तरुणांना नवी दिशा देण्यासाठी आणि समाज प्रबोधनासाठी एका नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. निशांत नाथाराम धापसे दिग्दर्शित चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच शेअर करण्यात आले आहे. अशोका विजयादशमीचे निमित्त साधत छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमामध्ये ‘जयभीम पँथर’चा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. एका संघर्षाची कहाणी या चित्रपटातून मांडली जाणार आहे. (Marathi Film)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘जयभीम पँथर’ चित्रपटाची निर्मिती नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन्सने केली आहे तर, रामभाऊ तायडे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट आणि मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा संस्थेचा मानस आहे. लेखक, दिग्दर्शक निशांत धापसे यांनी हलाल, भोंगा, भारत माझा देश आहे अशा अनेक चित्रपटांचे लेखक म्हणून, तर "अंकुश", "रंगीले फंटर" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या बऱ्याच चित्रपटांना राज्य पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Actor)

बहुजन तरुणांना नवी दिशा देण्यासाठी आणि समाज प्रबोधनासाठी एका नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि चित्रपटाची घोषणा जरी झाली असली तरी चित्रपटामध्ये कोणकोणते कलाकार असणार याची माहिती गुलदस्त्यात आहे. (Film Director)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT