मराठी सिनेरसिकांसाठी मार्च महिन्यात मनोरंजनाची खास मेजवाणी असणार आहे. मार्च महिन्यामध्ये त्यांच्या भेटीला अनेक चांगल्या धाटणीचे मराठी चित्रपट येणार आहेत. या चित्रपटांमधील एक म्हणजे'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' (Alibaba Aani Chalishitale Chor Movie). या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), मुक्ता बर्वे (Mukta Barve), उमेश कामत (Umesh Kamat) आणि श्रृती मराठे (Shruti Marathe) हे कलाकार तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली होती. अशामध्ये आता या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. या चोरांमधील खरा अलीबाबा कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’ हा मल्टिस्टारर चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. पोस्टरधील कलाकारांच्या चेहऱ्यावरील चित्रविचित्र, प्रश्नार्थक हावभाव पाहून काहीतरी गडबड असल्याचा अंदाज येतोय. त्यातच लिपस्टिकचे निशाण ही उत्सुकता अधिक वाढवतेय. आता यामागचे गुपित मात्र चित्रपट रिलीज झाल्यानंतरच उलगडणार आहेत. या पोस्टरमध्ये मु्क्ता बर्वे, सुबोध भावे, श्रृती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर, अतुल परचुरे आणि आनंद इंगळे हे कलाकार दिसत आहे.
मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रृती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर, अतुल परचुरे आणि आनंद इंगळे हे सर्व मातब्बर कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास पर्वणीच ठरणार आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’ या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे. तर नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
दिग्दर्शक आदित्य इंगळेने सांगितले की, 'या चाळीशीतील चोरांनी केलेला गुन्हा जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली असेल. मात्र या गुन्ह्याची उकल चित्रपट आल्यावरच होणार आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. यात विनोद, धमाल, गोंधळ आणि मजा आहे.' या चित्रपटाचे नाव खूपच जबरदस्त आणि उस्तुकता वाढवणारे आहे. विवाहित असण्याचा गुन्हा चित्रपटातील या चाळीशीतील चोरांनी केला आहे. त्यामुळे विवाहित असणे गुन्हा आहे का? आणि हे नेमके काय प्रकरण आहे? तुम्हाला पडलेल्या या प्रश्नांची उत्तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच म्हणजे २९ मार्चला मिळतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.