Prashant Damale New Announcement At Sakal Premier Award 2023 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prashant Damale: ‘माझा वारसदार मी शोधलाय...’ म्हणत प्रशांत दामलेंनी केली महत्वाची घोषणा

चित्रपटात काम करणाऱ्या सर्वांनी सुरुवातीला किमान चार ते पाच वर्षे रंगभूमीवर काम करणे फार गरजेचे आहे, म्हणत कलाकारांशी संवाद साधला.

Chetan Bodke

Prashant Damale New Announcement At sakal premier 2023: प्रशांत दामलेंनी मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयातील ठसा उमटवत प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले. नाटक क्षेत्रासाठी नेहमीच प्रशांत दामले नेहमीच काही ना काही तरी करण्याच्या प्रयत्नात असतात. नुकत्याच ‘प्रीमियर नाट्यसेवा सन्मान’ सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती, यावेळी त्यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना कलाकारांशी संवाद साधला.

चित्रपटात काम करणाऱ्या सर्वांनी सुरुवातीला किमान चार ते पाच वर्षे रंगभूमीवर काम करणे फार गरजेचे आहे. तेथे तुमच्या कलेचा कस लागेल, कामाची एकंदरीत पद्धतच बदलेल आणि मग तुमची चित्रपटसृष्टीतील कारकीर्दही बहरेल, असा सल्ला मराठी नाट्यसृष्टीतील नटसम्राट प्रशांत दामले यांनी होतकरू अभिनेत्यांना दिला.

प्रत्येक कलाकाराने सर्वात आधी रंगभूमीसोबत जुळवून घेतले पाहिजे. नाटकासोबत आपले नाते घट्ट केले पाहिजे. तिथे ओळख निर्माण केली पाहिजे, तर ते कलाकार सिनेसृष्टीत आपले पाय घट्ट रोवत उभे राहू शकतील. टिकून राहण्यासाठी रंगभूमीसोबतचे नाते कायम राहिले पाहिजे, असा सल्ला देखील यावेळी दामलेंनी दिला.

तुम्ही रंगभूमीवरून चित्रपटात जा. इथून तुम्हाला खूप शिकायला मिळेल. तुमचा दिग्दर्शक पहिल्याच शॉटमध्ये तुमच्यावर नक्कीच खुश होईल. दिग्दर्शकाच्या डोक्याला शॉट लागून उपयोग नसतो, असा सल्ला देताच यावेळी सभागृहात एक हशा पिकला. (Latest Entertainment News)

यावेळी प्रशांत दामलेंनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करणाऱ्या पुष्कर श्रोत्रीलाही नाटकात जास्त काम करत जा, असा सल्ला दिला. चित्रपट करण्याची मला खूप इच्छा आहे; पण माझ्या नाटकाचे प्रयोग रद्द करून मी ते करू शकत नाही. माझ्या नाटकाच्या प्रयोगांवर माझी ५० माणसे अवलंबून आहेत. १९९२ पासून ती माझ्यासोबत आहेत. त्यामुळे फार दिवस मी चित्रपटासाठी नाही देऊ शकत. संख्येपेक्षा दर्जाला महत्त्व द्या. अशा चित्रपटात काम करताना मजा आली पाहिजे. त्या चित्रपटांमध्ये तुमच्यातही टोकाची स्पर्धा झाली पाहिजे, असा सल्ला देखील यावेळी दामलेंनी दिला.(Latest Marathi News)

माझा वारसदार मी शोधलाय!

दोन प्रयोगांनंतर आता माझे १२ हजार ६०० नाट्यप्रयोग होतील; पण माझा वारसा तयार करण्याच्या दृष्टीनेही मी प्रयत्न करतो आहे. कारण मला कधीतरी दुसऱ्या कलाकाराकडे माझा वारसा द्यावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया मी सुरू केली आहे. मला रंगमंचावर पाय खेचत खेचत काम करण्याची अजिबात इच्छा नाही. जोपर्यंत मला चांगले काम जमते तोपर्यंत मी ते करणार, हे नक्की. नाही जमणार, असा मला संशय येईल तेव्हा मी थांबेन. त्यामुळे धावपटूंसारखे माझ्या हातातील बॅटन पुढे देण्यासाठी मी दुसरा कलाकार शोधला आहे, अशी प्रांजळ कबुलीही प्रशांत दामले यांनी दिली आणि नकळत प्रेक्षकही काहीसे गहिवरले.(Marathi TV Serial)

‘सकाळ’चे आभार

कोरोनाच्या संकटकाळात ‘सकाळ’ समूहाने सर्वात आधी नाटकांना सवलतीच्या दरात जाहिरातीची मुभा देऊन आम्हाला मदत केली. त्यामुळे ‘सकाळ’ची आम्हा कलावंतांच्या मनात एक वेगळीच प्रतिमा आहे, असे सांगत प्रशांत दामले यांनी ‘सकाळ’चे मुक्तकंठाने आभार मानले. अभिनेत्री अश्विनी भावे यांनीही कोरोनाकाळात बॅकस्टेज आर्टिस्टच्या मदतीसाठी २० लाख रुपये दिल्याची आठवण सांगत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. राज्य सरकार आणि आयआरबी अशा अनेकांनी कोरोना संकटकाळात पुन्हा उभे राहण्यासाठी खूप मदत केली, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT