Mard Mavala Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sangharsh Yodha Movie: 'संघर्षयोद्धा'मधील दुसरं 'मर्दमावळा' गाणं रिलीज, २६ एप्रिलला चित्रपट येतोय भेटीला

Mard Mavala Song Released: 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट (Sangharsh Yodha Movie) येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर, टीझर, पहिल्या गाण्यानंतर आता दुसरं गाणं 'मर्दमावळा' रिलीज करण्यात आले आहे.

Priya More

Mard Mavala Song Out:

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयोद्धा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट (Sangharsh Yodha Movie) येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर, टीझर, पहिल्या गाण्यानंतर आता दुसरं गाणं 'मर्दमावळा' रिलीज करण्यात आले आहे.

'संघर्षयोद्धा' चित्रपटाचा टीजर तसेच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'उधळीन मी...' या सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातलं 'मर्दमावळा' हे धडाकेबाज गाणं रिलीज करण्यात आलं आहे. दिव्य कुमार यांच्या दमदार आवाजात हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे. हे गाणं देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मर्दमावळा हे गाणं दिव्यकुमार यांनी गायलं आहे. मंगेश कांगणे यांच्या शब्दांना चिनार महेश यांचं दमदार संगीत लाभले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा समाजानं केलेलं अफाट प्रेम, आरक्षणासाठी राज्यभर फिरताना त्यांना मिळालेला तुफान प्रतिसाद, त्यांच्या सभांना झालेली गर्दी या गाण्यात दाखविण्यात आली आहे. उत्तम गाण्याचं नेत्रदीपक चित्रीकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वासारखंच 'मर्दमावळा' हे गाणंही रांगडेपण दर्शवणारं आहे.

'संघर्षयोद्धा' या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे. यासोबतच या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT