Terav Movie Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Terav Trailer: संदीप पाठक- किरण माने यांच्या 'तेरवं'चा ट्रेलर रिलीज, ८ मार्चला चित्रपट येतोय भेटीला

Kiran Mane And Sandip Pathak Terav Movie: या चित्रपटाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे दर्शन घडणार आहे. हा चित्रपट महिला दिनानिमित्त म्हणजे ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

Priya More

Terav Movie:

मराठी सिनेरसिकांसाठी मार्च महिना खूपच खास असणार आहे. या महिन्यामध्ये अनेक चांगल्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापैकी एक चित्रपट म्हणजे तेरवं (Terav Movie). काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे दर्शन घडणार आहे. हा चित्रपट महिला दिनानिमित्त म्हणजे ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

'तेरव' बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे मत यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हा ट्रेलर लॉन्च इव्हेंट संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर, अभिनेत्री नेहा दंडाळे, श्रद्धाताई तेलंग, देवेंद्र लुटे हे कलाकार उपस्थित होते.

विदर्भ, मराठवाडा, खानदेश या कापूसपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि 'कॉटन सॉईल तंत्र' या विषयावर यासंदर्भात काम होणे गरजेचे आहे. पण श्याम पेठकर यांनी याआधी 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या विषय अत्यंत परिणामकारक पद्धतीने मांडला होता आणि आता आगामी 'तेरव' या चित्रपटातून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील त्या शेतकऱ्याची मागे एकटी उरलेली पत्नी म्हणजे एकल महिला यांच्या संघर्षावर चित्रपट लिहून लढण्याची उर्मी देणारा चित्रपट निर्माण केलेला आहे.

हा चित्रपट पूर्णतः विदर्भाच्या भाषेत आणि ९०% च्या वर विदर्भीय कलावंत घेऊन करण्यात आलेला आहे. चित्रपटाचे छायांकन सुप्रसिद्ध छायाचित्रणकार सुरेश देशमाने यांनी अत्यंत तळमळीने आणि आस्थेने केले, असे श्याम पेठकर यांनी सांगितले. हा चित्रपट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिलांच्या जीवन संघर्षावर आधारित आहे आणि त्या संकटांना न घाबरता कसा लढा देतात हे या चित्रपटात दाखवले आहे.

तेरवं या चित्रपटात किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे हे कलाकार आहेत. त्याचसोबत विदर्भातील मधुभैया जोशी, श्रद्धाताई तेलंग, प्रभाकर आंबोने, वत्सला पोलकमवार, प्रवीण इंगळे, देवेंद्र लुटे, यशवंत चोपडे, शर्वरी पेठकर, संहिता इथापे, वैदेही चौरे, दिलीप देवरणकर या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी दिवंगत शंकर बडे यांच्या कवितेला गाण्याचा साज देण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

India Playing 11 vs Eng : ओव्हल कसोटीत टीम इंडियात होणार ४ बदल; अशी असू शकते संभाव्य प्लेइंग ११

Eduacation News: राज्याच्या ७० आयटीआयमध्ये नवा अभ्यासक्रम; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Shravan 2025: श्रावणात जेवणाची योग्य वेळ कोणती?

महायुती सरकारला 'सुप्रीम' झटका, पोलिसांवर गुन्हे दाखल होणारच, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT