Musafiraa Movie Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Musafiraa Movie: 15 वर्षांपूर्वीची मैत्री परदेशात धुमाकूळ घालणार, 'मुसाफिरा'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Pushkar Jog And Pooja Sawant Movie: 'मुसाफिरा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Priya More

Musafiraa Trailer Out:

२०२४ या वर्षात जबरदस्त कंटेट असलेले मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. यामधीलच एक चित्रपट म्हणजे पुष्कर जोग (Pushkar Jog) आणि पूजा सावंत (Pooja Sawant) यांचा 'मुसाफिरा' (Musafiraa Movie). सध्या मुसाफिरा या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला हा भारतातील पहिला चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

'मुसाफिरा' या चित्रपटाचे दिग्दर्शन पुश्कर जोगने केले आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना या चित्रपटात दिसणार आहेत. आयुष्यात आलेले आणि येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटलं की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार हे आपल्याला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. त्यासाठी तुम्हाला २ फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे.

नुकताच पुष्कर जोग आणि पूजा सावंतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुसाफिरा चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत पुष्करने चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. हा ट्रेलर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'लाईफमध्ये आपण सगळेच मुसाफिरा असतो...फक्त या प्रवासात आपलं Happy Destination स्वतःलाच ठरवावं लागतं... ‘मुसाफिरा’ २ फेब्रुवारी २०२४ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात!'

आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

दिग्दर्शक पुष्कर जोगने या चित्रपटाबद्दल सांगितले की, 'मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचे होते. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात मैत्री किती महत्वाची हेही मुसाफिराच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. मैत्रीपर भाष्य करणारा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT