Mangesh Desai News House Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mangesh Desai House Video: घर म्हणजे नुसतं विटांच काम नसतं..., मंगेश देसाईंनी चाहत्यांना दाखवली आपल्या नव्या घराची खास झलक

Mangesh Desai Home Inside Video: मंगेश देसाईने मुंबईमध्ये घर खरेदी केलं असून गणेश जयंतीच्या मुहूर्तावर त्याने गृहप्रवेश केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे.

Priya More

Mangesh Desai Buy New House:

मराठी मनोरंजनसृष्टीतील (Marathi Film Industry) कलाकारांसाठी २०२३ वर्षांप्रमाणे २०२४ हे वर्ष खूपच खास ठरत आहे. या वर्षामध्ये काही कलाकारांनी लग्न करत आयुष्याची नवी सुरूवात केली तर काही कलाकारांनी मोठी झेप घेत स्वप्नातील घर खरेदी केले. मुंबईमध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे या कलाकारांना खूप आनंद झाला आहे.

आतापर्यंत प्राजक्ता माळी, ऋतुजा बागवे, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, प्रसाद खांडेकर, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, अक्षय केळकर, सई मांजरेकर, महेश मांजरेकर, अश्विनी कासार आणि प्राची पिसाट या कलाकारांनी नवीन घर खरेदी केले. आता या कलाकारांच्या यादीमध्ये आणखी एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याच्या नावाचा समावेश झाला आहे. अभिनेता मंगेश देसाईने मुंबईमध्ये घर खरेदी केलं असून गणेश जयंतीच्या मुहूर्तावर त्याने गृहप्रवेश केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे.

मंगेश देसाईने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने आपल्या नवीन घराची झलक दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मंगेश देसाईचे घर खूपच आलिशान आहे. त्याच्या घराच्या एन्ट्री गेटच्या बाजूलाच फुलांनी सजवलेली नेमप्लेट दिसत आहे. या नेमप्लेटवर मंगेश शलाका साहील देसाई असे नाव लिहिल्याचे दिसत आहे. मंगेश देसाईने या नेमप्लेटवर आपल्या पत्नीचे आणि मुलाचे नाव देखील लिहिले आहे. त्यानंतर त्याच्या घरातून इनसाइड लूक पाहायला मिळत आहे.

मंगेश देसाईच्या घरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आल्याचे दिसत आहे. त्याच्या घरातील सुंदर इंटेरिअरने सर्वांचे लक्ष वेधू घेतले. मंगेश देसाईच्या घरामध्ये गणपती, विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळत आहे. त्याचसोबत त्याला आतापर्यंत मिळालेली अवॉर्डची झलक देखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मंगेश देसाईचे संपूर्ण घर पारंपारिक पद्धतीने सजवण्यात आल्याचे दिसत आहे.

मंगेश देसाईच्या नवीन घराच्या पूजेला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि काही राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावत त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसंच त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओला देखील त्याच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती देत त्याला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मंगेश देसाईने नवीन घराचा हा व्हिडीओ इन्सावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'घर म्हणजे नुसतं विटांच काम नसते, घर पहाटेच सुंदर स्वप्नं असते, घर नात्यांचे रेशीम बंध असते, घरत्यात वास्तव्य करण्याचे अस्तित्व असते, आणि जेव्हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छांनी ते भरतं तेव्हा त्याला कोणाची दृष्ट लागू शकत नाही.' दरम्यान, 'धर्मवीर'च्या यशानंतर आता मंगेश देसाई 'धर्मवीर 2' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाईनेच केली आहे. या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

SCROLL FOR NEXT