Sandip Pathak Terav Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Terav Movie: स्त्रीशक्तीचं अनोख दर्शन घडवणार 'तेरवं', ८ मार्चला येणार भेटीला

Sandip Pathak Terav Movie: 'तेरवं' (Terav Movie) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे दर्शन घडणार आहे. हा चित्रपट महिला दिनानिमित्त म्हणजे ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya More

Terav Movie Poster Out:

मराठी सिनेसरिसकांसाठी यंदाचे वर्ष हे खूपच खास असणार आहे. या वर्षामध्ये अनेक चांगल्ये धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटांमध्ये नातेसंबंध, प्रेम, सामाजिक आणि राजकीय या विषयांवर आधारित चित्रपटांचा देखील समावेश आहे. नुकताच एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'तेरवं' (Terav Movie) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे दर्शन घडणार आहे. हा चित्रपट महिला दिनानिमित्त म्हणजे ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या काही शतकांमध्ये समाजात बदल घडले असले तरी देखील स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही. महिलांना आजही त्यांच्या हक्कासाठी लढावे लागत आहे. त्यामुळे एका कणखर स्त्रीची गोष्ट सांगणारा 'तेरवं' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ८ मार्चला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

हरिष इथापे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटामध्ये संदीप पाठकसह किरण खोजे, किरण माने, नेहा दंडाळे, शर्वरी पेठकर, प्रवीण इंगळे, संहिता इथापे हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. तेरवं या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. नरेंद्र जिचकार यांच्या अंजनीकृपा प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेतर्फे तेरवं चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नरेंद्र राहुरीकर हे या चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. श्याम पेठकर यांनी तेरवं चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर सुरेश देशमाने यांनी छायांकन, वीरेंद्र लाटणकर यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

'तेरवं' या चित्रपटामधून जनाबाई या महिलेची प्रेरणादायी कहाणी सांगण्यात येणार आहे. कौटुंबिक ते सामाजिक आव्हानं येऊनही जनाबाई खंबीरपणे त्याला कशाप्रकारे सामोरं जातात हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वेगळं काम निर्माण करणाऱ्या जनाबाईच्या स्त्रीशक्तीचं दर्शन या चित्रपटात घडवण्यात आले आहे. यंदाच्या महिला दिनानिमित्त तेरवं हा चित्रपट महिलांसाठी चांगलीच पर्वणी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT