Pravin Tarade With Wife saam tv
मनोरंजन बातम्या

तुला स्पेशल वाटावे यासाठी...., लग्नाच्या वाढदिवसानिमित्त Pravin Tarade ला पत्नीनं दिलं खास सरप्राईज, रोमँटिक VIDEO पाहिलात का?

Pravin Tarade Wedding Anniversary: स्नेहलने प्रविणला या खास दिवशी रोमॅण्टिक कॅन्डल लाईट डीनर दिलं. सध्या त्यांच्या या रोमॅण्टिक कॅन्डल लाईट डीनरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचीच चर्चा सुरू आहे.

Priya More

Pravin Tarade And Snehal Tarade:

मराठी सिनेसृष्टीचा (Marathi Film Industry) प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडेने (Pravin Tarade) नुकताच लग्नाचा १४ वा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रविण तरडेला (Pravin Tarade Wedding Anniversary) त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडेने खास सरप्राईज दिले.

स्नेहलने प्रविणला या खास दिवशी रोमॅण्टिक कॅन्डल लाईट डीनर दिलं. सध्या त्यांच्या या रोमॅण्टिक कॅन्डल लाईट डीनरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचीच चर्चा सुरू आहे. यावेळी प्रविण तरडेने देखील बायकोच्या बोटामध्ये अंगठी घालून तिला लग्नाच्या वाढदिवसाचे खास गिफ्ट दिलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्नेहल तरडेने लग्नाच्या १४ व्या वाढदिवसानिमित्त प्रविण तरडेला खास सरप्राईज दिले. तिने प्रविणसाठी समुद्र किनारी कॅन्डल लाइट डिनरचं आयोजन केलं होतं. स्नेहलचे हे सरप्राइज पाहून प्रविण देखील आश्चर्यचकीत झाला. बायकोचे हे खास प्रेम पाहून प्रविण तरडे भारावून गेला. ऐवढंच नाही तर प्रविणने बायकोला रिंग देत तिला देखील खास अंदाजमध्ये सरप्राइज दिलं. या कपलचा हा रोमँटिक अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वजण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

स्नेहल तरडेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'डार्लिंग तुला विशेष वाटण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन' असे लिहित प्रविण तरडेप्रती तिने प्रेम व्यक्त केले आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, समुद्रकिनारी कॅन्डल लाइट डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. समुद्र किनाऱ्यावर सुंदर असा कॅन्डल लाइट डिनरसाठी टेबल लावण्यात आला आहे. त्याला सुंदर अशी फुलांची सजावट आणि दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.

त्यानंतर प्रविण तरडे त्याठिकाणी येतो. हे सर्व चित्र पाहून तो चकीत होतो. त्याला काय बोलावे हेच सूचत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर तो स्नेहलला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिला महागडी डायमंड रिंग गिफ्ट देतो. त्यानंतर तो स्नेहलला घट्ट मिठी मारतो. त्यांचा हा रोमँटिक अंदाज खूपच जबरदस्त असून चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT