BOYZ 4 Trailer Instagram
मनोरंजन बातम्या

BOYZ 4 Official Trailer: ढुंग्या, धैर्या, कबीरचा पुन्हा पॅचअप होणार का? फुल्ल टू मनोरंजन करणाऱ्या ‘बॉईज ४’चा ट्रेलर प्रदर्शित

BOYZ 4 Trailer Out: ढुंग्या, धैर्या आणि कबीर या त्रिकुटांची धम्माल मस्ती पुन्हा एकदा ‘बॉईज ४’च्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Chetan Bodke

BOYZ 4 Official Trailer

ढुंग्या, धैर्या आणि कबीर या त्रिकुटांची धम्माल मस्ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. बॉईज, बॉईज २ आणि बॉईज ३च्या भरघोस यशानंतर आता पुन्हा एकदा तुफान राडा घालण्यासाठी ‘बॉईज ४’ सज्ज झाले आहेत. ‘बॉईज ४’चा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रॉडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ४’ची धमाल यावेळी चारपटीने वाढल्याचे दिसत आहे. फक्त धमालच वाढली नसून धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये आणखी काही सदस्यांचाही समावेश झाला आहे.

सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत चित्रपटामध्ये ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे या दमदार कलाकारांची स्टारकास्ट चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त चित्रपटामध्ये गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांचाही समावेश आहे. कलाकारांची ही टोळी यंदा जबरदस्त धिंगाणा घालणार यामध्ये तिळमात्र शंका नाही. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित आणि हृषिकेश कोळी लिखित चित्रपटाची निर्मिती लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे. (Marathi Film)

एखाद्या चित्रपटाचे चार भाग येणे, ही बाब मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच घडत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रत्येक 'बॉईज'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घातला होता, ट्रेलर पाहिल्यानंतर ‘बॉईज ४’ सुद्धा बॉक्स ऑफिसवर तितकाच धुमाकूळ घालेल.

शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये, धैर्या, ढुंग्या आणि कबीरमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. त्या त्रिकुटातील दोस्ती कोणत्या कारणामुळे तुटली?, धैर्या आणि ढुंग्या लंडनमध्ये कशाप्रकारे धुमाकूळ घालणार, त्यांचं पुन्हा पॅचअप होईल की हे अंतर त्यांच्यातील आणखीन वाढेल? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. कबीरच्या आयुष्यात पुन्हा कोणत्या मुलीची एन्ट्री होणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या २० ऑक्टोबरला मिळेल.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर सांगतात, “यावेळी बॉईज लंडनमध्ये धमाल करताना दिसणार आहेत. ट्रेलर पाहून याचा अंदाज आला असेलच. चित्रपटाविषयी माझ्यासह संपूर्ण टीमला चित्रपटाबद्दल खूपच उत्सुकता आहे. ट्रेलरला अवघ्या काही तासातच चांगले व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रेलरला सर्वांनाच आवडत असून प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे, हाच आमचा मुख्य हेतू होता. 'बॉईज'चा प्रत्येक भाग बनवताना हा पहिलाच भाग आहे, अशा पद्धतीनेच चित्रपट बनवण्याचा आमचा प्रयत्न होता. शाळेपासून सुरु झालेला बॉईजचा हा प्रवास आता डिग्री कॉलेजपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक नवीन गोष्टीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. दरवेळी प्रमाणे हा 'बॉईज' ही एक नवीन गोष्ट घेऊन येणार आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT