मनोरंजन बातम्या

या वयात काय सिद्ध करायचंय..., मराठमोळी अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे ट्रोल; नेटकऱ्यांनी दिले मराठी संस्कृतीचे धडे

Saie Tamhankar Trolled After Bikini Photoshoot: सई ताम्हणकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे. या फोटोशूटवरून नेटिझन्स सई ताम्हणकरला ट्रोल करत मराठी संस्कृतीचे धडे देत आहेत.

Priya More

Saie Tamhankar Photoshoot:

मराठी सिनेसृष्टीची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) या नाही तर त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. या वर्षात सई ताम्हणकर 'श्रीदेवी-प्रसन्न' या चित्रपटाच्या (Sridevi Prasanna Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशामध्ये सई ताम्हणकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे. या फोटोशूटवरून नेटिझन्स सई ताम्हणकरला ट्रोल करत मराठी संस्कृतीचे धडे देत आहेत.

सई ताम्हणकरने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूटमधील ३ फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये सईने पेस्टल कलरचा बिकीनी सूट परिधान केला आहे. या सूटवर सईने व्हाइट कलरचे जॅकेट घातले आहे. या बिकीनी सूटवर सईने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. या फोटोंमध्ये सई ताम्हणकर खूपच हॉट दिसत आहे. सई ताम्हणकरच्या या फोटोंना मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी चांगली पसंती दिली आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नम्रता संभेराव, मुधाराणी प्रभुलकर यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. सईच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक प्रचंड आवडला.

पण दुसरीकडे या फोटोशूटमुळे सई ताम्हणकरला नेटिझन्सने चांगलेच ट्रोल केले आहे. नेटिझन्सनी तिच्या या लूकवरून तिला चांगलेच धारेवर धरले आणि तिला मराठी संस्कृतीची जाणीव करून दिली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, या वयात काय सिद्ध करायचं आहे सई मॅम तुम्हाला? दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, 'मराठी संस्कृती जपली पाहिजे सईबाई.' तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'आपण कुठे राहतो आहे सई ताम्हणकर मराठी संस्कृती संपली का तुमची?'

तर इतर काही नेटकऱ्यांनी, 'हास्य जत्रामध्ये हसणारी ती सई हीच आहे का?','गरिबांची स्वस्तातील सनी (सई) लियोनी', 'सईचा थाट' अशा प्रकारच्या देखील कमेंट्स केल्या आहेत. सई ताम्हणकरला तिच्या नव्या फोटोशूटवरून ट्रोल केले असले तरी देखील तिच्या या फोटोंना १.५ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT