Prasad Oak Watch Main Atal Hoo Instagram
मनोरंजन बातम्या

Prasad Oak Watch Main Atal Hoo: ‘पंकज त्रिपाठी आता व्यक्ती न राहता...’ प्रसाद ओकने 'मैं अटल हूं' पाहिल्यानंतर चित्रपटाच्या स्टार कास्टचे केले कौतुक

Main Atal Hoo News: अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने 'मैं अटल हूं' चित्रपट पाहिला. यावेळी प्रसादने संपूर्ण चित्रपटाच्या स्टारकास्टचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Chetan Bodke

Prasad Oak Watch Main Atal Hoo

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीचा (Pankaj Tripathi) बहुप्रतिक्षित 'मैं अटल हूं' चित्रपट १९ जानेवारीला अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांसह अनेक सेलिब्रिटींनी अनेक समीक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. नुकतंच अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने 'मैं अटल हूं' चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्याने रवी जाधवने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यासोबतच पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे.

प्रसाद ओक आपल्या पोस्टमध्ये बोलतो, “ ‘मैं अटल हूँ’ रवी जाधवने आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. पण माझ्या मते ‘मैं अटल हूँ’ हा रवीचा आजपर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, छायाचित्रण, पार्श्वसंगीत, अभिनय आणि दिग्दर्शन याची उत्तम भट्टी जमलेली आहे.”

“ ‘पंकज त्रिपाठी’ ही आता व्यक्ती न राहता त्यांचे ‘विद्यापीठ’ झाले आहे. माझ्या मते या विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम आपण पाहिले. पण पुन्हा एकदा ‘मैं अटल हूँ’ हा अभ्यासक्रम सर्व अभिनेत्यांनी धडा घेण्यासारखा आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पंकज सरांनी अंगीकारलेली शरीर भाषा निव्वळ अप्रतिम.”

“ पंकज त्रिपाठी, रवी जाधव आणि मेघना जाधव यांच्यासह संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा..!!! रवी… तुझं अजून एक NATIONAL AWARD पक्क झालं रे मित्रा…!!!” असं म्हणत त्याने कौतुक केले आहे.

सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरामध्ये बॉक्स ऑफिसवर १ कोटींची कमाई केलेली आहे. स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर संथगतीने सुरूवात केली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांच्या या चित्रपटात पंकज त्रिपाठींसह अनेक कलाकारांनी काम केले आहे. भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओजच्या पाठिंब्याने या चित्रपटाची पटकथा ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी लिहिली आहे. तर सलीम-सुलेमान यांनी मनोज मुंतशिर यांनी संगीत दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Kitchen Hacks: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

Horoscope Today : विनाकरण कटकटी मागे लागतील, अफवा उठतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT