Adinath-Urmila Divorce saam Tv
मनोरंजन बातम्या

Adinath-Urmila Divorce: पती-पत्नी म्हणून वेगळे...; १६ वर्षांचा संसार मोडला, आदिनाथ कोठारे-उर्मिला कानेटकर यांनी घेतला घटस्फोट

Adinath-Urmila Divorce: अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. मुलगी जिजाच्या सहपालनाची जबाबदारी दोघे मिळून पार पाडणार असल्याचे सांगितले.

Shruti Vilas Kadam

Adinath-Urmila Divorce: मराठी मनोरंजन विश्वातून मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर दोघांनी एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.

आदिनाथ आणि उर्मिला यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो, खूप विचार केल्यानंतर, आम्ही, आदिनाथ महेश कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिज़ा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील.'

गेल्या काही वर्षांत मीडिया आणि तुम्हा सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहतील, अशी आम्हाला आशा आहे. म्हणूनच, आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा (Privacy) आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद. आदिनाथ आणि ऊर्मिला"

आदिनाथ आणि उर्मिला यांनी २०११ साली लग्न केले होते. १६ वर्षांच्या सहजीवनानंतर आदिनाथ आणि उर्मिला यांनी वेगवेगळ्या वाटा निवडल्या असल्या तरी मुलगी जिजाच्या संगोपनासाठी एकत्रपणे करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

राहुल गांधींकडून कार्यकर्त्यांचा विश्वासघात; काँग्रेसच्या महिला नेत्याचे गंभीर आरोप

Breastfeeding Mothers : बालकांना स्तनपान करणाऱ्या मातांसाठी या ५ गोष्टी नक्की कराव्यात, तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर फेरीवाल्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT