Nagraj Manjule New Dream Project Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nagraj Manjule: नागराज मंजुळेंनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर केले भाष्य, “शिवाजी महाराजांचा चित्रपट माझ्या पद्धतीने पूर्ण करणार पण...”

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी २०२१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपटाची घोषणा केली होती. गेले अनेक दिवसांपासून या चित्रपटाची काहीच चर्चा होत नव्हती, खुद्द नागराज यांनीच त्या चित्रपटावर आपले मत मांडले आहे.

Chetan Bodke

Nagraj Manjule New Dream Project: दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या आपल्या ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहेत. त्यांनी आता पर्यंत मराठी सिनेसृष्टीला दमदार चित्रपट दिले आहेत. नेहमीच नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत होत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. तो चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता अनेक दिवस झाले तरी, चित्रपटाबद्दल कोणतीच चर्चा नाही. अखेर त्यांनी त्या चित्रपटाबद्दल भाष्य केलंय.

सध्या दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यांचा हा चित्रपट येत्या ७ एप्रिल २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटानिमित्त एका मराठी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित तयार करत असलेल्या चित्रपटाबद्दल सांगितलं.

मुलाखतीत नागराज मंजुळे म्हणतात, “मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवतोय तो खूप चांगला व्हावा अशी माझी इच्छा आहे. महाराजांवर आधारित असलेला चित्रपट माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यामुळे मी त्याला खूप चांगल्या पद्धतीने बनवणार आहे. हा चित्रपट केल्यानंतर आपण खूप काही तरी चांगलं काम केल्याची भावना माझ्या मनात कायम असेल. त्यामुळे मला हा चित्रपट खूप घाई गडबडीत करायचा नाही. काहीतरी सिनेमा करायचा आणि नंतर तो मी केला असं म्हणायचा या विचारांचा मी नाही आणि मला तसं करायचं नाही.”

तर पुढे नागराज मंजुळे म्हणतात, “ मला माझे १०० टक्के देऊन हा चित्रपट पूर्ण करायचा आहे. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने त्या चित्रपटासाठी वेळ देत तो पूर्ण करणार आहे. आत्ता होईल किंवा नंतर होईल, पण नक्की हा चित्रपट होणार आहे. फक्त मला त्या चित्रपटाला घाई गडबडीत करायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा चित्रपट आहे आणि त्यामुळे तो जबाबदारीनेच केला पाहिजे.” त्यामुळे नागराज मंजुळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट ते कधी घेऊन येणार हे पाहणे औतसुक्याचे ठरणार आहे. त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT