Bigg Boss Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: विकास आणि अपूर्वामध्ये पुन्हा एकदा जुंपली, टास्क दरम्यान टीममध्ये तुफान राडा

विकास आपल्या टीमसाठी अगदी जीवपणाला लावत खेळताना दिसत आहे. अपूर्वाही आपल्या टीमसाठी अपार मेहनत घेत त्याच्या अंगावर बसत खेळण्याचा प्रयत्न करते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4 Latest Update: सध्या मराठी बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची बरीच चर्चा सुरु आहे. रोज काही ना काही नव-नवीन टास्क सध्या बिगबॉसच्या घरात स्पर्धकांना दिले जात आहे. त्यामुळे सर्वाधिक चर्चा बिग बॉसच्या घरातील टास्कची सुरु आहे. गेल्या महिन्यापासून सर्व स्पर्धक एकत्र राहत आहे, एकमेकांसोबत चांगली मैत्री प्रस्थापित ही झालेली दिसत आहे.

पहिल्या दिवसापासून सर्वाधिक गाजा-वाजा करत आपले स्थान कायम ठेवणारी स्पर्धक अपूर्वा नेमळेकरने आपले स्थान कायम ठेवले आहे. अपूर्वाची एक वेगळीच बाजू या शोमध्ये दिसून आला आहे.

नुकतेच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये विकास सावंत बरोबरच्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान विकास अपूर्वावर भारी पडलेला दिसून आला. यावेळी दोन्ही टीम कॅप्टन्सीसाठी खेळताना दिसत आहे. यादरम्यान विकास आपल्या टीमसाठी अगदी जीवपणाला लावत खेळताना दिसत आहे. अपूर्वाही आपल्या टीमसाठी अपार मेहनत घेत त्याच्या अंगावर बसत खेळण्याचा प्रयत्न करते. तरीही त्यांचा खेळ कायम पुढे सुरु असल्याचे दिसत आहे.

यावेळी अपूर्वाने विकासचे टी-शर्ट खेचणे, त्याला खाली ढकलणे, खाली पाडणे, अंगावर बसणे अशा जबरदस्त युक्त्या शोधत अपूर्वा विकाससोबत टास्क पूर्ण करत होती. विकासही तिला जुमानत नाही. तो सुद्धा तिच्यासोबत सामना करत खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. विकासची ही यशस्वी खेळीपाहून टीममधील सदस्यही खूश होऊन त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात.

व्हायरल झालेल्या या टीझरमध्ये प्रेक्षकही विकासचे कौतूक करत आहे. विकास तू मस्त खेळलास , विकास तू ग्रेट आहे. लयभारी विकास, तू एकटाच भारी पडलास अशा कमेंट चाहत्यांनी त्या व्हिडिओ खाली दिलेल्या आहेत. विकासच्या खेळीचे सर्वच कौतूक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Insomnia Relief: रात्री झोप येईना? 'या' ५ चुका टाळा मग येईल गाढ झोप

IPL 2006: राजा की रंक! पंजाब किंग्ससमोर 'करो की मरो'ची स्थिती; जाणून घ्या प्लेऑफचं संपूर्ण समीकरण

Political News: बड्या राजकीय नेत्याच्या मृत्यूनं राजकीय वर्तुळात खळबळ; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

School Reopen : १५ नाही तर २६ जून, शाळा सुरू होण्याची तारीख का बदलली जाणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Shivali Parab Photos: काय दिसते राव, एकदम कडक! शिवालीचे फोटो पाहून फिदा व्हाल

SCROLL FOR NEXT