Urmila Kothare: भारत देश सध्या तंत्रज्ञानाच्या युगात क्रांती करत आहे. भारत हा देश सर्वाधिक डिजीटल पेमेंट करणारा देश ठरला आहे. भारतात ही डिजीटल क्रांती काहीतरी नवे करु पाहत आहे. काही ठिकाणी याचा वापर खुप चांगल्या प्रकारे होत आहे, तर काही ठिकाणी याचा गैरवापर होत आहे. डिजीटल बॅंकिंग, नेट बॅंकिंगने व्यवहार सर्वाधिक जलद होण्यासाठी मदत होते. पण हाच वेळ वाचवण्यासाठी आपण खुप शॉर्टकटचा प्रयत्न करतो, पण हाच शॉर्टकट कधी तरी आपल्या अंगलट नक्कीच येतो.
या सायबर विश्वात वावरताना काय करावे व काय करु नये? याबाबत अर्धज्ञान नसणारे बरेच महारथी या विश्वात टपून बसलेत. त्यांची ही संधी आपला खिसा कापू शकतो. काही दिवसांपूर्वी सिम कार्ड केवायसी अपडेट करण्याच्या नादात प्रसिद्ध अभिनेत्रीला सायबर चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा गंडा घातला होता. पण आता सतर्कतेमुळं एका लोकप्रिय अभिनेत्रीची या सायबर क्राइमची शिकार होता होता वाचली आहे. हेच सायबर विश्वातील ज्ञान आपल्याला फार महत्वाचे आहे.
सायबर क्राईमची शिकारही फक्त सामान्य व्यक्तींचीच होऊ शकते असे नाही तर कलाकारांचीही होऊ शकते. काल मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री उर्मिला कोठारे सायबर शिकार होता होता वाचली. तिच्या सोबत घडलेला हा किस्सा लगेचच उर्मिलाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यात उर्मिलाने एक मॅसेज आल्याचे सांगत या मॅसेजमध्ये एचडीएफसी बॅंकेचा उल्लेख होता. सोबतच एक लिंकही दिलेली दिसत आहे. आपण नेहमी अशा लिंकवर लगेचच क्लिक करतो, पण मी तसं केलं नाही, असे तिने म्हटले आहे.
तिने या लिंकवर क्लिक करताच तिचं बॅंक अकाऊंट साफ करण्यात आले असते. पण सायबर क्राइमबद्दल जागरुक असल्याने तिने हे कृत्य करणे टाळले. त्या मॅसेजमध्ये उर्मिलाने लिहिले होते की,"तुम्ही एचडीएफसी बॅंकेतील खात्याची केवायसी अपडेट केलेली नाही. यामुळे तुमचं खातं ब्लॉक करण्यात आले आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा."
या मॅसेजचा स्क्रिनशॉट काढत तिने लिहिले की, "मला आताच असा एक मेसेज आला आहे. अनेकदा असा मेसेज वाचल्यानंतर लोक पॅनिक होतात आणि अशा लिंकवर क्लिक करतात. त्या लिंकवर क्लिक केल्याने तुमच्या खासगी गोष्टींची माहिती फ्रॉड लोकांकडे जाते.
त्यामुळे तुमचं बॅंक अकाऊंट हॅक होऊ शकतं. मला आलेला सर्वात प्रथम वाचला, त्यानंतर मॅसेजमधील लिंक मी पाहिली पण त्यामध्ये एचडीएफसी बॅंकेचे नाव पूर्ण लिहिण्यात आले नव्हते. त्यावेळी माझ्या मनात शंका निर्माण झाली. मित्रांनो माफ करा. माफ करा आज तुमचे नशिब जरा कमजोर आहे.
अशा पद्धतीचा मॅसेज पाहिल्यावर बरेच लोकं पॅनिक होतात, मोबाईलवर येणाऱ्या लिंकचा मॅसेज शांततेत वाचा आणि मगच क्लिक करा. असे आवाहन उर्मिलाने केले आहे. उर्मिलाच्या सावधगिरीने ती या सायबर क्राईमसारख्या गुन्ह्यात अडकली नाही, पण सामान्य नागरिक धकाधकीच्या आयुष्यात अनेक चुका होतात. त्याचा चांगलाच फटका आपल्याला बसू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.