Titeeksha Tawde And Siddharth Bodke Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Titeeksha Tawde आणि Siddharth Bodke अडकले विवाहबंधनात, लग्नाचा क्युट व्हिडिओ आला समोर

Titeeksha Tawde And Siddharth Bodke Wedding: 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडेने (Titeeksha Tawde) नुकताच 'दृश्यम 2' फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत (Siddharth Bodke) लग्न केले.

Priya More

Titeeksha Tawde Wedding:

मराठी मनोरंजनसृष्टीतील एकापोठापाठ एक सेलिब्रिटीं लग्न करत आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे. नुकताच अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर हे विवाहबंधनात अडकले. आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडेने (Titeeksha Tawde) नुकताच 'दृश्यम 2' फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत (Siddharth Bodke) लग्न केले. तितीक्षा आणि सिद्धार्थचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला. तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या लग्नाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या दोघांच्याही घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकताच या कपलची मेहंदी आणि हळदी सिरेमनी पार पडली. त्यानंतर आज या कपलने थाटामाटामध्ये लग्न केलं. दोघांच्याही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये त्यांनी लग्न केले. तितीक्षा आणि सिद्धार्थ दोघेही लग्नामध्ये खूपच क्युट दिसत होते. दोघांनी देखील रोमँटिक पोझ देत एकमेकांवर प्रेम व्यक्त केले आहे. त्यांच्या लग्नाचा क्युट व्हिडीओ व्हायरल होत आहे.

तितिक्षा आणि सिद्धार्थने लग्नामध्ये खूपच सुंदर अशी ड्रेसिंग केली होती. दोघांनी देखील एकाच लगांचे म्हणजे पेस्टल कलरची ड्रेसिंग केली होती. तितीक्षाने ऑफ व्हाईट आणि गोल्डन काठ असलेली नऊवारी साडी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि गोल्डन कलरचे धोतर नेसले होते. दोघेही लग्नामध्ये खूपच क्युट दिसत होते. या दोघांची ड्रेसिंग स्टाईल सर्वांना प्रचंड आवडत आहे.

तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाला त्यांच्या अभिनेत्री अनघा अतुल, रसिका सुनील, ऋतुजा बागवे, सुरुची अडारकर, ऐश्वर्या नारकर यांनी हजेरी लावली. या सर्व कलाकारांनी तितीक्षाच्या हळदी आणि संगीत सिरेमनीला देखील धम्माल केली होती. आता लग्नात देखील या सर्वांनी धम्माल केली. त्यांचे डान्स करतानाचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. तितीक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, तितीक्षा आणि सिद्धार्थ हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेम व्यक्त करत होते. पण त्यांनी कधीच आपल्या नात्याची माहिती उघडपणे सांगितली नव्हती. पण काही दिवसांपूर्वी दोघांनी आपल्या नात्याची कबुली देत लग्न करणार असल्याचे सांगितले. तितीक्षा आणि सिद्धार्थ यांची मैत्री खूपच जुनी आहे. २०१५ साली ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत मुख्य कलाकारांच्या मित्र-मैत्रिणींची भूमिका हे दोघेजण साकारत होतो. त्या मालिकेपासूनच त्यांची मैत्री आहे. अखेर तितीक्षाने आपल्या मित्राचीच निवड खऱ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आशिष शेलार यांच्या वोट जिहाद च्या मुद्द्याला मनसेकडून जोरदार उत्तर

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

Chanakya Niti: सर्वात जास्त ज्यावर प्रेम करतो तोच घात करतो? चाणक्यांनी सांगितलं गुपित

Forest Department Recruitment: खुशखबर! वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Moto G67 Power 5G Launched: अडीच बॅटरी बॅकअप, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, ५० मेगापिक्सेल कॅमेरा; दमदार फीचरवाला Moto चा G67 Power 5G लाँच

SCROLL FOR NEXT