Titeeksha Tawde And Siddharth Bodke Engagement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Titeeksha Tawde आणि Siddharth Bodke ने उरकला गुपचूप साखरपुडा, रोमँटिक फोटो केले शेअर

Titeeksha Tawde And Siddharth Bodke Engagement: 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तितीक्षा तावडे 'दृश्यम 2' फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत (Siddharth Bodke) लग्न करणार आहे.

Priya More

Titeeksha Tawde And Siddharth Bodke:

मराठी मनोरंजनसृष्टीतील एकापोठापाठ एक सेलिब्रिटीं लग्न करत आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे. नुकताच अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर हे विवाहबंधनात अडकले. आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तितीक्षा तावडे 'दृश्यम 2' फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत (Siddharth Bodke) लग्न करणार आहे. नुकताच तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या लग्नाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या दोघांच्याही घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकताच या कपलची मेहंदी सिरेमनी पार पडली होती. त्यानंतर आज या कपलने गुपचूप साखरपुडा उरकला. दोघांनी देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे. साखरपुड्यामध्ये तितीक्षा आणि सिद्धार्थ दोघेही खूपच क्युट दिसत होते. दोघांनी देखील रोमँटिक पोझ देत एकमेकांवर प्रेम व्यक्त केले आहे.

तितीक्षाने साखपुड्याचे क्युट फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'फॉरेव्हर विथ माय बेस्ट फ्रेंड' या कॅप्शनमध्ये तितीक्षाने हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे. तितीक्षा आणि सिद्धार्थने साखपुड्यामध्ये खूपच सुंदर ड्रेसिंग केली होती. तितीक्षाने लाइट लेव्हेंडर कलरची सुंदर साडी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाइट कलरचा शेरवानी सूट परिधान केला होता. तितीक्षा या साडीमध्ये खूपच क्युट दिसत होती. तर सिद्धार्थ या ड्रेसिंगमध्ये हँडसम दिसत होता. तितीक्षाच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. चाहत्यांकडून या कपलवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर तितीक्षाच्या या पोस्टवर कमेंट्स करत ऐश्वर्या नारकर, निखिल बने, ऋतुजा बागवे, सुरूची अडारकर, तन्वी मुंडल या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी तितीक्षाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम सिद्धार्थ बोडकेसोबतचा फोटो पोस्ट करत लग्नाबाबतची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. तितीक्षा लग्न करणार असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला होता. तितीक्षाने सिद्धार्थसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'He asked me out on a date, it turned out to be a केळवण.' तितीक्षाने या पोस्टसोबत रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केला होता.

तितीक्षा आणि सिद्धार्थ हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेम व्यक्त करत होते. पण त्यांनी कधीच आपल्या नात्याची माहिती उघडपणे सांगितली नव्हती. पण काही दिवसांपूर्वी दोघांनी आपल्या नात्याची कबुली देत लग्न करणार असल्याचे सांगितले. तितीक्षा आणि सिद्धार्थ यांची मैत्री खूपच जुनी आहे. २०१५ साली ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत मुख्य कलाकारांच्या मित्र-मैत्रिणींची भूमिका हे दोघेजण साकारत होतो. त्या मालिकेपासूनच त्यांची मैत्री आहे. अखेर तितीक्षाने आपल्या मित्राचीच निवड खऱ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : महाराष्ट्रात घराणेशाहीचा पराभव; महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर PM नरेंद्र मोदी काय म्हणाले?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT