Tejaswini Pandit  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tejaswini Pandit: 'आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता', राज्यातील परिस्थितीवर मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

Tejaswini Pandit On Maharashtra Situation: पुण्यामध्ये ४ हजार कोटींचा ड्रग्जसाठा सापडला. या घटनांमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. अशामध्ये एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यातील परिस्थितीवर खंत व्यक्त केली आहे.

Priya More

Tejaswini Pandit Post:

राज्यामध्ये गुन्हेगारीच्या (Maharashtra Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या हत्या, गोळीबार, अत्याचार, तोडफोड अशाप्रकारच्या घटना सतत समोर येत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. नुकताच पुण्यामध्ये ४ हजार कोटींचा ड्रग्जसाठा सापडला. या घटनांमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. अशामध्ये एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यातील परिस्थितीवर खंत व्यक्त केली आहे.

मराठमोळी अभिनेत्री तेजस्वीनी पंडित ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी ती प्रत्येक विषयांवर स्पष्टपणे आणि परखड मत व्यक्त करत असते. मग तो विषय सामाजिक असो वा राजकीय. तेजस्वीनी पंडितने नुकताच राज्यातील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. महत्वाचे म्हणजे तेजस्विनीच्या या पोस्टला पसंती देत चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे.

तेजस्विनी पंडितने या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच… आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज…? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता.' अशी पोस्ट करत तेजस्विनीने यामध्ये तुटलेला हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे. तेजस्विनीच्या या पोस्टला पसंती देत तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे. तेजस्विनी पंडितच्या या पोस्टला ५९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अडीच हजारांपेक्षा अधिक जणांनी लाइक केले आहे.

तेजस्विनीच्या पोस्टवर सोलापूर सूनबाई या ट्विटर अकाऊंटवरून कमेंट्स करण्यात आली असून त्यांनी असे लिहिले की, 'खूप खूप आभाळभरून कौतूक तुझ तेजस्विनी... जिथे मोठी मोठी लोक मूग गिळून गप्प बसली आहेत, तू न घाबरता निर्भिडपणे आपलं मत मांडत आहेस, महाराष्ट्रासाठी उभी आहेस.'

आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, 'तेजस्विनी जी आता कदाचित तुमच्यावर काहीतरी आरोप केले जातील...ट्रोल केलं जाईल !! पण महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत असू. अशेच व्यक्त होत रहा.' तर आणखी एका युजरने लिहिले की, 'खर आहे, महाराष्ट्राचं वैचारिक दिवाळं निघत चाललंय आणि सर्व प्रसिद्ध लोकं मुक्याची भूमिका घेत आहेत. अभिनंदन स्वतःच मत निर्भिडपणे व्यक्त केल्याबद्दल. अजून खूप लोकांना हे करण्याची गरज आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शनमोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

Manoj Jarange Patil: हवं तर गोळ्या घाला’; जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, सरकारवर आडकाठीचा आरोप

SCROLL FOR NEXT