Tejasvini Pandit New Movie Announcement  Instagram/ @tejaswini_pandit
मनोरंजन बातम्या

तेजस्विनी पंडित पुन्हा नव्या वेबसीरिज येतेय; पोस्ट बघताच काहीतरी भन्नाट असणार हे नक्की!

Tejasvini Pandit : अनेक हिट वेबसीरिजनंतर 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन वेबसीरिज प्रेक्षकांच्या समोर आणत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सध्या अनेक मराठी वेबविश्वात वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहे. चित्रपटांपेक्षा सर्वाधिक प्रेक्षकांचा कल वेबसीरिजकडे आहे. 'रानबाजार' वेबसीरिजनंतर मराठी वेबविश्वात बदल होताना दिसत आहे. अनेक ओटीटी माध्यमांवर प्रेक्षक जगभरातील आशय पाहत असतात. रानबाजार, मी पुन्हा येईन या वेबसीरिजनंतर 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन वेबसीरिज प्रेक्षकांच्या समोर आणत आहे.

जयंत पवार दिग्दर्शित, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत 'अथांग' वेबसीरिजची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पहिली झलक सादर केली आहे. अभिनेता विक्रम गायकवाडने आपल्या सोशल मीडियावरुन पोस्टशेअर करत माहिती दिली आहे. पोस्टखाली‘दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घेऊन येत आहोत अथांगची पहिली झलक’कॅप्शन दिले आहे.

वेबसीरिजच्या पोस्टमध्ये एका महिलेच्या पायातून रक्त वाहताना दिसत आहे. पोस्ट पाहता, वेबसीरिजमध्ये 'सस्पेन्स थ्रिलर' जॉनर असण्याची शक्यता आहे. अद्याप या वेबसीरिजमधील पात्र गुलदस्त्यात असून वेबसीरिजच्या प्रदर्शनाची तारीखही घोषणा करण्यात आलेली नाही.

सध्या प्लॅनेट मराठी आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दमदार कलाकृती घेऊन येत आहेत. 'रानबाजार' आणि 'मी पुन्हा येईन' वेबसीरिजने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. नुकताच काही दिवसांपूर्वी “मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी” ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून तो चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर प्लॅनेट मराठीसोबत रिअॅलिटी शोची निर्मिती करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा

Numerology: या तारखेला जन्मलेली व्यक्ती असते श्रीमंत, राजसारखे आयुष्य जगते

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

SCROLL FOR NEXT