Raj Thackeray News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर... अभिनेत्री तेजस्वी पंडित नेमकं काय म्हणाली?

Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अजब गजब पॉडकास्टमध्ये राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर खूप भारी होईल असं मत व्यक्त केलं. राजकारणात येण्याबाबत विचारता ती म्हणाली, "सध्या तरी मी अभिनेत्री म्हणून खूप खुश आहे."

Alisha Khedekar

अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या तिच्या आगामी 'येरे येरे पैसा३' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटानिम्मित्त ती वेगवेगळ्या मुलाखती देखील देत आहे. तेजस्विनी नेहमी तिच्या अभिनय क्षेत्रात जितकी सक्रिय असते तितकीच ती राजकारणातही सक्रिय असते. अनेकदा ती राजकारणाबद्दल असलेलं तिचं परखडं मत मांडते. अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही कट्टर मनसैनिक आहे. तिचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना असलेला पाठिंबा बरेचदा उघडपणे दिसतो. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिने राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर ... याबाबत पॉडकास्टच्या माध्यमातून तिने तिचं मत व्यक्त केलं आहे.

अभिनेत्री तेजस्वी पंडित हिने अजब गजब या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तिला राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर... असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, "असं झालं तर खूप भारी असेल. कारण त्यांच व्हिजन खूप छान आहे. मला नेहमी त्यांच्या बोलण्यातूनच जाणवतं की तो माणूस महाराष्ट्राला सर्वात वरती ठेवतो. कुटुंबांपेक्षाही वर ठेवतो.

माझ्या मते हे खूप महत्त्वाचं आहे. असे आपल्याकडे खूप कमी राजकारणी आहेत. नितीन गडकरी मस्त बोलतात, शरद पवार सुद्धा . कधी कधी वाटत त्यांच्या मेंदूचा अभ्यास केला पाहिजे एवढे ते हुशार आहेत. त्यावेळी विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे काय भाषण करायचे!खरोखर पूर्वीची राजकारणी माणसं वेगळी होती. आणि राजकारणही वेगळं होत. "

या मुलाखतीत तेजस्विनीला भविष्यात राजकारणात येणार का असं विचारलं असता त्यावर तिने म्हटलं की, "माझा राजकारणाचा अभ्यास खूप आहे असं नाही पण मी खूप आधीपासून ते फॉलो करत आले आहे. त्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकते आणि मला त्यातला फरक कळतो म्हणून मी बोलते. ज्या गोष्टी मला पटतात त्या बाजूने मी उभी राहते. समाजकारण करण्यासाठी राजकारणात यावच लागतं असं नाही पण लोकांनी याकडे एक संधी म्हणून ही पाहिलं पाहिजे. सध्या तरी मी अभिनेत्री म्हणून खूप खुश आहे. मला याव्यतिरिक्त काही येईल असं वाटत नाही." असं ती म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT