Shubha Godbole Fight With Cancer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shubha Godbole: मेधा मांजरेकरांनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर; 'केमो कर्ल्स' पोस्टमधून व्यक्त केल्या भावना

Shubha Godbole Fight With Cancer : मराठी अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी कॅन्सरवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली. 'केमो कर्ल्स' पोस्टमधून त्यांनी नव्या लूकसह धैर्याने सुरू असलेल्या कॅन्सरविरोधातील लढ्याची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

Shruti Vilas Kadam

Shubha Godbole: मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी नुकतेच स्वतःला कॅन्सर झाल्याची माहिती दिल्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री शुभा गोडबोले यांनीही कॅन्सरशी झुंज देत असल्याचे उघड केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या एका भावनिक पोस्टमुळे चाहत्यांना त्यांच्या आजाराची माहिती मिळाली असून, त्यांच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शुभा गोडबोले यांनी इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांचे नव्याने आलेले कुरळे केस दिसत आहेत. या केसांबद्दल आणि त्यांच्या कॅन्सरबद्दल त्यांनी पोस्टमध्ये सविस्तर लिहिताना म्हटले, "माझे हे नवीन कुरळे केस... माझ्या आधीच्या केसांपेक्षा अगदीच वेगळे. 'केमो कर्ल्स' (chemo curls) नावाचीही एक गोष्ट असते हे मला गुगल केल्यावरच समजलं. केमोदरम्यान केस पूर्णपणे गळून गेल्यावर, पुन्हा येणारे केस कुरळे असतात. काही लोकांचे केस नंतर पुन्हा मूळ स्वरूपात येतात, तर काहींचे तसे होत नाही. असं दिसतंय की माझे हे 'केमो कर्ल्स' आता कायमचेच राहणार आहेत!! मला नक्की कोणते केस जास्त आवडतात, हेच मला ठरवता येत नाहीये.

शुभा गोडबोले यांना गेल्या वर्षी कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर नियमित उपचार सुरू असून त्या धैर्याने या आजाराचा सामना करत आहेत. कठीण परिस्थितीतही त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर चाहते, सहकलाकार आणि अनेक कलाकारांनी त्यांना लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे.

शुभा गोडबोले या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. 'अग्गंबाई सुनबाई', 'जाऊ नको दूर बाबा', 'दुर्गा', 'ट्रान्स अफेअर' आणि 'तुझेच मी गात आहे' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याशिवाय त्यांनी अनेक नाटकांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कराडला मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बॅंनर फाडले

Rahul Gandhi: 'राहुल गांधी चर्चेपासून पळू नका...', सत्ताधारी आक्रमक, संसद परिसरात काढला मोर्चा

बाजारात जाण्याची गरज नाही! घरच्या घरी कुंडीमध्ये उगवतील अशा ५ भाज्या; आजच सुरू करा किचन गार्डनिंग!

PM SVANidhi Yojana : फेरीवाल्यांसाठी खुशखबर! मिळणार ₹30,000 पर्यंत क्रेडिट कार्ड; 50 दिवस व्याज नाही

फ्लॅट मालकांसाठी मोठी बातमी! भाडेकरूने नियम मोडला तर दंड कोणाला भरावा लागणार? सोसायटीचा नियम ऐकून उडेल झोप

SCROLL FOR NEXT