Shivani Rangole Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Shivani Rangole Viral Video: ‘ही तूच आहेस का?’, शिवानी रांगोळेला विचारला जातोय प्रश्न, व्हायरल VIDEO तुम्ही पाहिलात का?

Shivani Rangole News: सोशल मीडियावर शिवानी रांगोळेचा एक बालपणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Shivani Rangole Viral Video

‘सुभेदार’मधून शिवानी रांगोळे प्रचंड चर्चेत आली आहे. अनेक टेलिव्हिजन सिरीयल आणि चित्रपटातून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अशातच सध्या सोशल मीडियावर तिची सिरीयलमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ ‘उपनिषद गंगा’ या मालिकेतील आहे.

नेहमीच सोशल मीडियावर गोंडस फोटोंमुळे चर्चेत राहणारी शिवानी सध्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. नुकताच हा व्हिडीओ अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केला असून तिच्या हटक्या कॅप्शनची चाहत्यांमध्ये चर्चा होते. डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ‘उपनिषद गंगा’ मालिकेतला हा व्हिडीओ आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या वडिलांसोबत ती गणित शिकताना दिसत आहे. तिने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केलेला आहे.

त्या व्हिडीओला शिवानीने कॅप्शन दिले की, “माझं लहानपणीचं काम अचानक इन्स्टाग्रामला दिसू लागलं आणि मला खूप लोकांनी विचारलं की ‘ही तूच आहेस का?’!! गंमत वाटली की इतक्या वर्षांनी ही मी बहुतेक तशीच दिसत असेन म्हणून लोकांनी लगेच ओळखलं! इयत्ता पाचवीत असताना डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी ह्यांच्या ‘उपनिषद गंगा’ नावाच्या मालिकेतली ही छोटीशी क्लिप!”

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तिच्या कामाचे कौतुक केले आहे. दरम्यान, तिच्या कामाबद्दल सांगायचे तर, शिवानीने अभिनयाची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. ‘उपनिषद गंगा’ या मालिकेमध्ये जेव्हा ती होती, तेव्हा ती पाचवीला होती.

तिच्या कामाबद्दल सांगायचे तर, बन मस्का आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा या मालिकेच्या माध्यामातून विशेष ओळख मिळाली. सोबतच शिवानी सध्या ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यासोबतच गेल्या काही दिवसांपूर्वी शिवराज अष्टकातील ‘सुभेदार’मध्ये तिने मुख्य भूमिका साकरली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT