Sanskruti Balgude Close WhatsApp Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanskruti Balgude Interview : संस्कृती बालगुडेने घेतला WhatsApp न वापरण्याचा निर्णय; कारण सांगत स्वत:च केला खुलासा

Chetan Bodke

सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे गैरफायदेही आहेत. दिवसेंदिवस लोकांची व्हॉट्स ॲपमधील क्रेझ वाढत चालली आहे. खरंतर व्हॉट्स ॲप हे संवादाचं उत्तम साधन आहे. त्यामुळे आपण जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीसोबत सहज संवाद साधू शकतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कोण व्हॉट्सॲप वापरत नाही, असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. पण आम्ही तुम्हाला आज एक अभिनेत्री सांगणार आहोत, जी व्हॉट्सॲप वापरत नाही. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री संस्कृती बालगुडे आहे.

अभिनयासोबतच नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या संस्कृती बालगुडेने २०१४ साली 'पिंजरा' मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारत ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. नुकतंच संस्कृतीने एका पॉडकास्ट चॅनलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये तिने व्हॉट्स ॲप वापरत नाही, असं सांगितलं आहे. पण असं असलं तरीही ती कायमच फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.

संस्कृतीने नुकतंच 'मित्र म्हणे' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. मुलाखतीत तिने व्हॉट्स ॲप वापरत नसल्याचेही सांगितले. तिला "तू whatsapp का बंद केलं?" असा प्रश्न विचारला, यावर तिने एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, "त्यावेळी नुकतंच व्हॉट्सॲपचं ते ब्लू टीकचं नवं फिचर आलं होतं. मी घरी आले होते, त्यावेळी मला कोणीतरी मॅसेज केला. ती व्यक्ती मला म्हणते, तू माझा मॅसेज बघूनही का रिप्लाय दिला नाहीस ?"

"जेव्हा नेमका मॅसेज आला, त्यावेळी आपण कदाचित कामात असू शकतो किंवा मी मेसेज बघितला असेल आणि तेव्हाच मला शूटसाठी बोलवलं असेल. अशा वेळी आपण फोन देतो किंवा नंतर कधी रेंज नसल्यामुळेदेखील बघायचं राहून जातं. असे अनेक वेगवेगळे कारणं असू शकतात. त्यावेळी मला असं झालं की, आपल्यावर हे बंधनं कशाला हवेत ? कदाचित आपण त्यावेळी कामात बिझी असू."

"अनेकजण म्हणतात की, ब्लू टिक बंद करून टाकायची. पण हे मला पटत नाही. मला ही छुपाछुपीदेखील जमत नाही. व्हॉट्सॲपवर ग्रुप होतात आणि मग लोक ग्रांटेड पकडायला लागतात. मी तुला व्हॉट्सॲप केलेलं ना? असं म्हणतात. पण, तुम्ही फोन करा ना... काही गोष्टी फोनवर सांगितल्या पाहिजेत. व्हॉट्सॲप बंद केल्यामुळे मला अनेकांनी फोन केले." असंही संस्कृती पुढे म्हणाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT