Sai Tamhankar Post On Anish Jog Birthday Instagram
मनोरंजन बातम्या

Anish Jog Birthday: ‘हॅप्पी बर्थडे माय...’; सईने लाडक्या दौलतरावाला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

Sai Tamhankar Post On Anish Jog Birthday: सईने तिच्या लाडक्या दौलतरावासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sai Tamhankar Post In Anish Jog Birthday:फॅशन क्विन सई ताम्हणकर नेहमीच आपल्या हटक्या अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. सई ताम्हणकर गेल्या काही दिवसांपूर्वीची स्पेनवारी बरीचस चर्चेत राहिली. स्पेनमध्ये सई आणि मराठी चित्रपट निर्माता अनिश जोग यांच्या नात्याची तुफान चर्चा झाली होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकरचा वाढदिवस झाला, आज अनिशचा वाढदिवस. अनिशच्या वाढदिवसानिमित्त सईने पोस्ट शेअर केली आहे. सईने तिच्या लाडक्या दौलतरावासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अनिशचा २ जुलै अर्थात आज वाढदिवस असतो. सईने अनिशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा एक रोमँटिक बुमरँग व्हिडिओ आणि एक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणते, “हॅप्पी बर्थडे माय Gem! भरभरून जग, खूश रहा. त्यांनी तुझ्यासारखे लोक निर्माण करणं थाबवलंय, पण तू माझ्या आयुष्यात आहेस, याचा मला आनंद आहे.” #birthdayboy #appleofmyeye असे हॅशटॅग्ज देऊन तिने पोस्ट शेअर केली आहे. सईच्या पोस्टवर अनिश जोगने ‘थँक्स माय लव्ह’ असे उत्तर दिले आहे.

सईच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही निर्माता अनिश जोगला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रार्थना बेहेरे, प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी या सेलिब्रिटींसह काही सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनिश आणि सई व्हेकेशनसाठी स्पेनला गेले होते. तिथले काही फोटो दोघांनी सोशल मीडियावर एकत्र शेअर केले होते.

अनिश बद्दल सांगायचे तर, तो एक प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माता असून त्याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटाची निर्मिती केली. त्याने ‘टाईमप्लीज’, ‘व्हायझेड’, ‘मुरांबा’, ‘गर्लफ्रेंड’ आणि ‘धुरळा’ या सारख्या चित्रपटाची निर्मिती केली. (Marathi Film)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT