Viju mane post for Priya Marathe Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priya Marathe Death: 'मला वडील नाहीत, माझे वडील बनाल...'; प्रिया मराठेसाठी विजू मानेंची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Priya Marathe Passes Away: मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Shruti Vilas Kadam

Priya Marathe Passes Away: मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता मिरा रोड, मुंबई येथे त्यांच्या राहत्या घरी प्राणज्योत मालवली.

प्रिया मराठे या मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील एक गाजलेलं नाव आहे. या सुखांनो या, चार दिवस सासूचे, तू तिथे मी यांसारख्या मालिकांमधून त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. हिंदी मालिकांमध्ये त्यांनी कसम से, पवित्र रिश्ता, बड़े अच्छे लगते हैं, साथ निभाना साथिया यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. पवित्र रिश्तामधील ‘वर्षा’ ही भूमिका विशेष गाजली.

त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. दिग्दर्शक विजू माने यांनी एक खास पोस्ट सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये विजू माने यांनी लिहीले, "मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का?" हा तिने विचारलेला प्रश्न अजूनही कानात आहे. सssssssर अशी मोठ्यान्ने हाक मारून अक्षरशः लहान मुलीसारखी बिलगायची. माझ्या बायकोहून जास्त वयाच्या ह्या पोरीला मी मनापासून 'लेक' मानलं होतं. बांदोडकर काॅलेजात एक माॅब प्ले केला होता. अ फेअरी टेल...प्रियाचं रंगभूमीवरलं पहिलं काम. तिला अगदी बोटाला धरून एकांकिकेत आणलं. राजकन्या होती त्यात ती. तेच बोट धरून माझ्या आयुष्यात वावरली. माझ्या मुलीला मी सांगायचो, तुझ्याआधी मला एक मुलगी आहे बरं का... तिच्या आयुष्यातले खूप चढ उतार पाहिले. शंतनुसारखा गोड मुलगा तिला मिळाला. खूप बरं वाटलं होतं. गोष्ट अशी संपायला नको होती प्रिया. बाबा मिस यू...बाबा लव्ह यू.

सुबोध भावे यांनी त्यांना “लढवय्या बहिण” म्हणत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पवित्र रिश्तातील त्यांच्या सहकलाकार उषा नाडकर्णी यांनीही हळहळ व्यक्त करत म्हटलं, “पहिला सुशांत आपल्यातून गेला आणि आता प्रिया… हे फार मोठं दुःख आहे.” प्रिया मराठे यांच्या निधनामुळे मराठी-हिंदी मनोरंजन विश्वाने एक प्रतिभावान, मेहनती आणि जिद्दी अभिनेत्री गमावली आहे. त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रोहनच्या मृतदेहावर ४२ तासांनंतर अंत्यसंस्कार

Kerala Tourist News : मुंबईच्या तरुणीचा केरळमध्ये विनयभंग, तीन टॅक्सी चालक अटकेत, नेमकं काय घडलं?

Winter Skin Care : हिवाळ्यात कोरड्या त्वचेवर उपाय, असा बनवा ऍव्होकॅडो आणि मध फेसपॅक

एक दिवस राज्य हातात द्या, नायकच्या अनिल कपूरसारखं काम करेल, पवारांचा आमदार असं का म्हणाला? VIDEO

Local Body Election : मोठी बातमी! आयोगाची आज पत्रकार परिषद, निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT