Priya Marathe Passes Away 
मनोरंजन बातम्या

Priya Marathe Passes Away : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Priya Marathe Passes Away at 38 After Battling Cancer : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले आहे. कर्करोगाशी झुंज देत अखेरचा श्वास घेतला.

Namdeo Kumbhar

  • मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन.

  • कर्करोगाशी झुंज देत अखेरचा श्वास घेतला.

  • पवित्र रिश्ता मालिकेत त्यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होत्या.

  • संध्याकाळी मीरा रोड येथे अंतिम संस्कार होणार.

Priya Marathe Passes Away : मराठी आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झालेय. आज पहाटे ४ वाजता मीरा रोड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

'पवित्र रिश्ता', 'या सुखांनो या', 'बडे अच्छे लगते हैं', आणि 'तू भेटशी नव्याने' यांसारख्या मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सध्या त्या 'तू भेटशी नव्याने' या मालिकेत रागिणी अग्निहोत्री ही खलनायकी भूमिका साकारत होत्या. त्यांच्या निधनाबाबत अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रिया मराठे हिने मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केलेय. प्रिया मराठेचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी ठाण्यात झाला होता. २००६ मध्ये ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या हिंदी मालिका आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले. तिने ‘विघ्नहर्ता महागणपती’ आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ (२०१६) या मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. प्रिया सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सक्रिय नव्हते. २४ एप्रिल २०१२ रोजी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी लग्न केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT