Priya Bapat Interview Saam tv
मनोरंजन बातम्या

Priya Bapat Interview : दीपिकाने केलेलं चालतं... इंटीमेट सीनमुळे ट्रोल झालेल्या प्रिया बापटने नेटकऱ्यांना सुनावले

Priya Bapat News : प्रियाने ट्रोल करणाऱ्यांना चांगलच सुनावले आहे. "मी पूर्वी ट्रोलिंगला प्रतिसाद द्यायची. पण आता याकडे दुर्लक्ष करते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Priya Bapat Talks On Trolling : मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध जोडी म्हणून उमेश-प्रियाला ओळखले जाते. उमेश कामत आणि प्रिया बापटची लव्ह स्टोरी सर्वांनाच माहित आहे. उमेश आणि प्रिया नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी, यश-अपयश, ट्रोलिंग या सर्व मुद्द्यांवर मत मांडली.

प्रिया-उमेशची केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच आवडते. कॉलेजपासूनची ओळख ते लग्न हा प्रिया-उमेशचा प्रवासाबद्दल ते नेहमीच बोलतात. नुकतीच प्रिया तिच्या 'सिटी ऑफ ड्रिम्स ३' या वेबसीरीजमुळे चांगलीच चर्चेत आली होती. या वेबसीरीजमधील एका सीनमुळे प्रियाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. तर आता एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत, प्रिया ट्रोलिंगवर जरा स्पष्टच बोलली. (Latest Marathi Entertainment News)

प्रियाने (Priya) ट्रोल करणाऱ्यांना चांगलच सुनावले आहे. "मी पूर्वी ट्रोलिंगला प्रतिसाद द्यायची. पण आता याकडे दुर्लक्ष करते. 'सिटी ऑफ ड्रिम्स' सीरीजच्या पहिल्या सीझननंतर मला प्रचंड ट्रोल करण्यात आले. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझननंतर माझं कौतुकही केलं. त्यामुळे मी काम करावं, माझ्या कामावर मी श्रद्धा ठेवावी, प्रामाणिकपणे मेहनत करावं एवढंच माझ्या हातात आहे. इंटिमेट सीनबद्दल मात्र मी ठाम मत मांडते"असं प्रिया म्हणाली.

'मराठी अभिनेत्री (Actress) हिंदीत गेली तर हिंदीत तिला काम मिळावं म्हणून तिनं इंटिमेट सीन्स केले असं म्हटलं जातं. पण मग दीपिका (Deepika) पदुकोण 'गेहराइयाँ'मध्ये तसेच सीन्स करते तेव्हा तिला ट्रोल केलं जात नाही. तेव्हा तुम्ही तिच्याकडे कलाकार आणि परफॉर्मन्स म्हणून बघता. मला मात्र 'इंटिमेट सीन केलेस. तुला कसं वाटलं?' असा प्रश्न विचारला जातो.

''मुळात हा प्रश्नच येतोच का? तुम्ही याकडे माझ्या कामाचा भाग म्हणून का नाही बघत? माझ्या कामाचा भाग म्हणून मी तो सीन केला. तिथेच विषय संपला. इतर भाषिक कलाकारांनी असे सीन्स केले तर त्यांना त्याबाबत विचारलं जातात का? मग आपणच ते प्रश्न विचारून अधोरेखित का करतो? मला त्यावर चर्चा करणंच महत्त्वाचं वाटत नाही. कामाचा भाग म्हणून मी एखाद्या सीनमध्ये रडते तर दुसऱ्यामध्ये इंटिमेट सीनही करते.'' असं म्हणत प्रियाने ट्रेलिंगला उत्तर दिले आहे.

प्रियाच्या या उत्तराने मात्र ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलंय. प्रिया ही नेहमी नवीन नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत असते. तिच्या अभिनयाचे सर्व क्षेत्रातून कौतुक होताना दिसतं. प्रियाने आता मराठी नंतर हिंदीत पदार्पण केल्याने तिचं फार कौतुक होत आहे. नुकतीच प्रिया 'सिटी ऑफ ड्रिम्स ३' मध्ये झळकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT