Prarthana Behere: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या एक खास अनुभव सांगितला आहे. यामध्ये तिने मासिक पाळीच्या काळात देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. असे नमुद केले आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने सांगितले की, ती शाळेत असताना एका सहलीला गेली होती. त्या वेळी तिची मासिक पाळी सुरू होती. मंदिरात जाण्यापूर्वी तिला अनेकांनी सांगितले होते की, अशा वेळी मंदिरात प्रवेश करणे अयोग्य मानले जाते. मात्र तिने तो सामाजिक दबाव झुगारून देत थेट मंदिरात प्रवेश केला आणि देवीचे दर्शन घेतले.
ती म्हणाली “देवी माझ्यासाठी आईसमान आहे. आईकडे जायला कुठले बंधन नसते. म्हणूनच मी दर्शन घेतले. पण दर्शन घेतल्यानंतर माझ्या मनात अपराधीपणाची भावना होती. म्हणून मी देवीसमोर हात जोडून म्हटलं, देवी, जर माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल तर मला माफ कर.”
या घटनेचा उल्लेख करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यापासून तो वेगाने व्हायरल झाला. यावरून नेटिझन्समध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. काहींनी प्रार्थनाच्या या कृतीवर टीका करताना धार्मिक परंपरा व नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले. तर दुसऱ्या बाजूला अनेकांनी तिच्या धाडसाचे आणि प्रामाणिकतेचे कौतुक केले आहे.
सोशल मीडियावरून काहींनी प्रश्न उपस्थित केला आहे की, मासिक पाळीच्या काळात महिलांनी मंदिरात जाण्यास बंदी का असावी? तर काहींनी असा युक्तिवाद केला की, या प्रथा महिलांचा सन्मान करण्यासाठी होत्या, मात्र कालांतराने त्याचा चुकीचा अर्थ घेतला जातो. येत्या काळात प्रार्थना 'मर्दिनी' या चित्रपटात झळकणार आहे. आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.