Phulwanti SAAM TV
मनोरंजन बातम्या

Phulwanti : 'प्राजक्ता माळी'ची अख्ख्या महाराष्ट्रावर जादू; 'फुलवंती' ला मिळाला कडक रिस्पॉन्स, VIDEO शेअर करत म्हणाली...

Prajakta Mali : 'फुलवंती'ला महाराष्ट्रातून भरपूर प्रेम मिळत आहे. अशात प्राजक्ता माळीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'फुलवंती'ची (Phulwanti) चर्चा पाहायला मिळत आहे. मराठी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. ११पासून या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्राजक्ता माळीनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सणाच्या दिवशी दसऱ्यालाही 'फुलवंती'ला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) या चित्रपटात मुख्य भूमिकेसोबतच चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. प्रत्येकाकडून 'फुलवंती'ची तुफान कौतुक होताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा एवढा भन्नाट प्रतिसाद पाहून प्राजक्ता माळी भारावून गेली आहे. तिने आपल्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

प्राजक्ताने व्हिडीओ शेअर करून रसिक प्रेक्षकांचे खूप आभार मानले आहे. तसेच 'फुलवंती'चे जवळजवळ सगळे शो हाऊसफुल झाल्याचे तिने सांगितले आहे. चित्रपटावर महाराष्ट्रातून प्रेमाचा वर्षाव होतोय असे ती म्हणाली आहे. तसेच प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "कृतज्ञ… फुलवंती..,सर्वत्र प्रदर्शित"

या चित्रपटात 'फुलवंती'ची भूमिका प्राजक्ता माळी तर व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांची भूमिका गश्मीर महाजनी यांनी साकारली आहे. या चित्रपटात तुम्हाला पेशवेकाळातील भव्यता अनुभवता येईल. 'फुलवंती' हा चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'फुलवंती' कादंबरीवर आधारित आहे.

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने आणि मनमिळावू स्वभावाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या विविध लूकचे फोटो ती शेअर करत राहते. तिच्या अदा पाहून कायमच चाहते घायाळ होतात. तसेच प्राजक्ता अभिनयासोबत एक उत्तम गायिका आणि एक यशस्वी व्यावसायिका देखील आहे. तिची जुळून येती रेशीमगाठी मालिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली. तिने अनेक हिट चित्रपट देखील केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT