Prajakta Mali Diet SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Diet : काय ती अदा अन् काय ते रूप... प्राजूच्या फिगरची चाहत्यांना भुरळ, काय आहे फिटनेस फंडा?

Shreya Maskar

मराठी इंडस्ट्रीतील प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय कलाकार आहे. जगभरात तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने अनेक मालिकांमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्राजक्ताचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे. ती आपल्या मराठमोळ्या लूकचे फोटो कायम शेअर करत राहते. तिच्या फोटोंवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडतात.

अभिनेत्री, कवियत्री आणि व्यावसायिक प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या लूकमुळे चर्चेत असते. तिच्या प्रत्येक अदांवर चाहते फिदा असतात. तिच्या फिटनेस तसेच तिच्या डाएट बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. प्राजक्ता अनेक मुलाखतीत तसेच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत असते. चला तर मग आज प्राजूच्या फिटनेस (Prajakta Mali Fitness ) रहस्य जाणून घेऊयात.

प्राजक्ताच डाएट रूटीन

प्राजक्ता आपल्या आहारात सकस अन्नाचा समावेश करते. त्याचसोबत ती नियमित व्यायाम देखील करते. ती व्यायाम आणि आहारात योग्य समतोल ठेवते. व्यायाम करताना शरीरातून घाम येणे महत्त्वाच आहे. प्राजक्ता सकाळी उठल्यावर भरपूर पाणी पिते. ज्यामुळे शरीरासोबत त्वचा देखील हायड्रेट राहते. त्यानंतर ती फलाहार करते. फ्रेश झाल्यावर पौष्टिक नाश्ता करते. तसेच तिच्या दुपारच्या जेवणात चपाती, हिरवी पालेभाजी, वरण यांचा समावेश असतो. प्राजक्ताला घरचे जेवण खूप जास्त आवडते. तसेच प्राजक्त चहाप्रेमी आहे. त्यामुळे ती संध्याकाळचा चहा आवर्जून पिते. मात्र ती चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालते. ८ ते ९ च्या मध्ये प्राजक्ता रात्रीचे जेवण करते. प्राजक्ता शरीरासोबतच स्कीन केअर तसेच हेअर केअरवर देखील खूप लक्ष देते.

प्राजक्ता डाएटसोबत नियमित योगा देखील करते. एका मुलाखतीत तिने चांगल्या आरोग्यासाठी ती अष्टांग योगा करते असे सांगितले होते. यामुळे स्किन, शरीर आणि मन तिन्ही गोष्टी तंदुरुस्त राहतात. प्राजक्ता दिवसातून एक तास फक्त स्वतःसोबत घालवते. जेणेकरून ती आपल्या शरीराला आणि मनाला आराम देते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray Speech : तुम्ही महाराष्ट्राचे मालक, मग कशाला रडताय? राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा परप्रांतीय

Mumbai Fort : 'या' किल्ल्यावरून मायानगरीचा सुरेख नजारा अनुभवा

Maharashtra News Live Updates : बीडच्या केज तालुक्यात पितृपक्षाच्या जेवनातून 23 जणांना विषबाधा

Lalbagcha Raja: 'लालबागचा राजा'च्या हुंडीत लाखो रुपयाचे दागिने; अर्पण झालेल्या सोन्या-चांदीचा लिलाव सुरू

Dhruv Rathee : प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी झाला बाप; सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा फोटो

SCROLL FOR NEXT