Pooja Sawant Vat Purnima Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pooja Sawant Vat Purnima : पती ऑस्टेलियात, पूजा सावंत भारतात; अभिनेत्रीची पहिली वटपौर्णिमा, पारंपारिक लूक एकदा पाहाच

Vat Purnima 2024 : कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत हिची लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे. सिद्धेश ऑस्ट्रेलियात असून पूजा भारतात आहे. यावेळी अभिनेत्रीने पारंपारिक लूक करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Chetan Bodke

ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. आजच्या दिवशी पतीला दिर्घायुष्य लाभण्यासाठी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. हा सण संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे. सेलिब्रिटी मंडळीही हा सण साजरा करताना दिसत आहे.

अनेक सेलिब्रिटी कपल्ससाठी ही आजचा सण खूप खास आहे. २०२४ वर्षाच्या सुरुवातीला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आहे. यामध्ये इंडस्ट्रीतील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत हिची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. सध्या अभिनेत्री लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरा करीत आहे.

सध्या पूजा भारतात आहे. पूजाने लग्नाच्या नंतरचा पहिला गुढीपाडवा सणही तिने सेलिब्रेट केला होता. आता अभिनेत्रीने वटपौर्णिमा सण साजरी केला आहे. पूजाने तिच्या पहिल्या वटपौर्णिमेची झलक इन्स्टाग्रामवरही शेअर केलेली आहे.

पूजाचा नवरा सिद्धेश जरीही ऑस्ट्रेलियात असला तरीही पूजाने तिची पहिली वटपौर्णिमा भारतात साजरी केली आहे. पूजाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असताना, ‘पहिली वटपौर्णिमा... सिद्धेश आज तुझी खूप आठवण येतेय.’ असं कॅप्शन देत सुंदर फोटो शेअर केले आहेत. पूजाने अगदी पारंपरिक पद्धतीने लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे. पारंपरिक लूकमध्ये पूजा खूपच सुंदर दिसतेय.

वटपौर्णिमेच्या सणाला पूजाने पिवळ्या आणि लाल रंगाची काठ असलेली काठापदराची साडी नेसली होती. यावर तिने गळ्यात ठुशी घालून, गळ्यात सुंदर मंगळसूत्र घालून वडाच्या झाडाची पूजा केली.

नाकात नथ, हातात हिरवा चुडा आणि मराठमोळ्या अंदाजात लूक पूर्ण करून तिने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सध्या अभिनेत्रीच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून तिच्या लूकचे चाहते कौतुक करीत आहे. पूजाने इन्स्टावर पूजेच्या ताटाचा फोटोही शेअर केलेला आहे.

पूजा सावंतने २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली आहे. पूजा सावंतने इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीसोबत नाही तर, एका बिझनेसमन व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. सध्या पूजा करियरच्या शिखरावर आहे. त्यानंतर तिने लग्नाचा मोठा निर्णय घेतलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

SCROLL FOR NEXT