Indrayani Serial Promo SaamTv
मनोरंजन बातम्या

Indrayani Serial:'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अनिता दाते दिसणार नव्या मालिकेमध्ये; संदीप पाठकसोबत करणार स्क्रीन शेअर, प्रोमो पाहिलात का?

Anita Date New Serial: अभिनेत्री अनिता दाते नेहमीच चर्चेत असते. अनिता दातेची माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. अनिता दाते आता पुन्हा एकदा इंद्रायणी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Marathi Actress Anita Date And Sandeep Pathak New Serial Indrayani Promo:

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही लोकप्रिय मालिका होती. मालिकेतील राधिका हे पात्र सर्वांनाच आवडले होते. राधिका हे पात्र अनिता दातेने साकारले होते. अनिता दाते अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनिता दाते आता पुन्हा एकदा नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Latest News)

अनिता दाते लवकरच 'इंद्रायणी' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २५ फेब्रुवारीपासून ही मालिका कलर्स या वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. अनिता दाते गेल्या काही दिवसापासून छोट्या पडद्यापासून लांब होती. त्यामुळे प्रेक्षकांनी तिने पुन्हा मालिकेत काम करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता अभिनेत्री पुन्हा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

प्रोमोमध्ये अनिता गजरा तयार करताना दिसत आहे. अनिता गजरा तयार करताना चाफा बोलेना, चाफा चालेना हे गाणे बोलताना दिसत आहे. त्यावेळी तिते बसलेली तीन लहान मुले चाफा आता गेला असं म्हणतात. त्यानंतर लाइटचा ब्लब फुटताना दिसतो. हा लाइटचा बल्ब संदीप पाठकच्या हातून फुटताना दिसत आहे. यावरुन मालिकेत संदीप पाठक मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे कळत आहे. त्यानंतर अनिता दाते सर्व मुलांना ओरडताना दिसत आहे. हा प्रोमो प्रेक्षकांना खूपच आवडलेला दिसत आहे.

अनिता दाते अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनिता दातेचा 'वाळवी' हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला होता. त्यानंतर ती नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT