Pardeep Kharera Second Marriage  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pardeep Kharera Second Marriage : अभिनेत्री मानसी नाईकच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्न, प्रदीप खरेराची बायको आहे तरी कोण?

Manasi Naik Ex Husband Wedding : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकच्या एक्स पतीने दुसरे लग्न केले आहे. प्रदीप खरेराच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

अभिनेत्री मानसी नाईकच्या एक्स नवऱ्याने दुसरे लग्न केले आहे.

प्रदीप खरेराच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रदीप खरेराच्या दुसऱ्या बायकोचे अभिनय क्षेत्रासोबत खास कनेक्शन आहे.

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. अशात आता मानसी नाईकचा एक्स नवरा प्रदीप खरेराने दुसरे लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. प्रदीप खरेराने दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. प्रदीप खरेराच्या बायकोचे मनोरंजन सृष्टीसोबत एक खास कनेक्शन आहे. प्रदीप खरेराने विशाखा जाटनीसोबत लग्नगाठ बांधली आहे.

प्रदीप खरेराची बायको विशाखा जाटनी ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. विशाखा जाटनीने 'गेम ऑफ ग्लोरी मध्ये सहभागी घेतला होता. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 8.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. प्रदीप खरेरा आणि विशाखाने 'सेल्फी' हे गाणे एकत्र केले. तर प्रदीप खरेरा उत्तम बॉक्सर आणि मॉडेल आहे. तसेच तो देखील सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. प्रदीप खरेरा आणि विशाखा जाटनी यांनी जुलै 2024 मध्ये साखरपुडा केला होता.

प्रदीप खरेराचे पहिले लग्न मराठी अभिनेत्री मानसी नाईकसोबत 2021 साली झाले होते. त्यानंतर दोन वर्षांच्या आतच प्रदीप खरेरा आणि मानसी नाईक यांचा घटस्फोट झाला. त्यांनी आपले नाते मोडले आणि विभक्त झाले. यामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. यांनी खूप थाटामाटात लग्न केले होते. त्यानंतर वर्षभरातच त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि हे जोडपे वेगळे झाले. आता सध्या मानसी नाईक आपल्या करिअरकडे लक्ष देत आहे. तर प्रदीप खरेराने नवीन संसार थाटला आहे.

प्रदीप खरेरा आणि विशाखा जाटनी यांनी 27 नोव्हेंबरला लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी हळद, मेहंदी असे लग्नाआधीचे सर्व समारंभ थाटात केले. प्रदीप खरेरा आणि विशाखा जाटनी यांना चाहते , कलाकार मंडळी शुभेच्छा देताना दिसत आहेत. दोघांनी लग्नासाठी पारंपरिक लूक केला होता. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

MNS-Shivsena: संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटं चर्चा; लवकरच युतीची घोषणा होणार

Akola : मंत्र्यांसमोरच शिवसेनेच्या २ गटामध्ये तुफान राडा, एकमेकांच्या अंगावर धावले अन् खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न

Bhimashankar Mandir: महत्त्वाची बातमी! भीमाशंकर मंदिर 3 महिन्यासाठी राहणार बंद; कारण काय?

Famous Actor : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याने आयुष्य संपवलं; मनोरंजनसृष्टीत खळबळ

SCROLL FOR NEXT