Chandu Champion Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chandu Champion Film : ‘चंदू चॅम्पियन’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीची जोरदार चर्चा, केलं कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं कौतुक

Hemangi Kavi In Chandu Champion Film : सध्या कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत असून या चित्रपटामध्ये एक मराठमोळी अभिनेत्रीही दिसली आहे. तिने या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली.

Chetan Bodke

गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता कार्तिक आर्यन याच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. हा चित्रपट पॅरालिम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता कार्तिक आर्यन आहे. अशातच या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सुद्धा दिसणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. तिने चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने शुटिंग दरम्यानचा किस्सा शेअर केला आहे.

हेमांगी कवीने पोस्टमध्ये लिहिलंय की, "पद्मश्री पुरस्कार विजेते पॅरालिम्पिक विजेते मुरलीकांत राजाराम पेटकर यांचा ‘चंदू चॅम्पियन’ हा बायोपिक अप्रतिम आहे. माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एका दिग्दर्शकानी ह्या चित्रपटाचे सुंदरपणे दिग्दर्शन केले आहे. अत्यंत प्रतिभावान, प्रचंड मेहनती, गुणी आणि ध्येयाप्रती एकाग्र असलेला कलाकार कार्तिक आर्यन ज्याने या चित्रपटात मुरलीकांत यांचे पात्र अगदी उत्तमपणे साकारले आहे. त्याच्यासोबत काम करणं ही अभिमानाची गोष्ट आहे." असं म्हणत हेमांगीने कार्तिकचं कौतुक केलं आहे. हेमांगीने चित्रपटामध्ये मुरलीकांत पेटकर यांच्या आईचे पात्र साकारले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी केली आहे. 'चंदू चॅम्पियन' हा पॅरालिम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांचा जीवनपट आहे. सैन्य अधिकारी असलेल्या मुरलीकांत पेटकर यांना १९६५ मध्ये झालेल्या भारत- पाक लढाईत अपंगत्व आले होते. त्यांनी या अपंगत्वावर मात करत पॅरालिम्पिक मध्ये तीन स्पर्धा प्रकारांमध्ये विजेतेपद मिळवलं. त्यांचा हा सगळा प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४.७५ कोटींची कमाई केलेली आहे.

हेमांगी कवीच्या कामाबद्दल बोलायचे तर, सध्या हेमांगी 'मॅडनेस मचाएंगे' या शोच्या माध्यमातून ती चाहत्यांचे मनोरंजन करीत आहे. त्यासोबतच 'कैसे मुझे तुम मिल गयी' या हिंदी मालिकेतूनही हेमांगी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. हेमांगी शेवटची 'तमाशा लाईव्ह' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सध्या हेमांगीला तिचा चाहतावर्ग मराठी चित्रपटामध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Hairstyles: मेसी वेणी आणि बबल पोनीटेल, ऑफिस आणि कॉलेजसाठी 5 मिनिटांत होतील अश्या झटपट 5 हेअरस्टाईल्स

Kidney disease symptoms: किडनी खराब होण्याआधी ही लक्षणं लगेच ओळखा, मान आणि चेहऱ्यावर मिळतात संकेत

Health Tips : मानेचं दुखणं हे तीव्र डोकेदुखीचं कारण असू शकतं का? तज्ज्ञांनी सांगितलं, असं का होतंय?

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

SCROLL FOR NEXT