Amruta Khanvilkar AI PHOTO
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Amruta Khanvilkar Talk On Divorce With Himanshu Malhotra : मराठी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यावर अभिनेत्रीने स्पष्ट उत्तर दिले आहे.

Shreya Maskar

अमृता खानविलकरच्या घटस्फोटाची चर्चा

अमृता आणि हिमांशु वेगळे राहतात

अभिनेत्रीने नात्याबद्दल केला मोठा खुलासा

मनोरंजन विश्वातील लाडके जोडी अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांनी अलिकेडच आपल्या घटस्फोटाची माहिती दिली. अशात आता आणखी एक मराठी जोडपे लवकरच वेगळे होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ही जोडी दुसरी-तिसरी कोणी नसून 'चंद्रमुखी' फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिंदी इंडस्ट्रीचा हिरो हिमांशु मल्होत्रा ​​आहे. त्यांच्या नात्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा ​​गेल्या दीड वर्षांपासून वेगळे राहत आहेत, परंतु त्यांच्यात विभक्त होण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये अमृता आणि हिमांशु लग्न बंधनात अडकले होते. दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असूनही अजूनही एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध टिकवून आहेत. अमृता-हिमांशु यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, "आम्ही अजूनही विवाहित आहोत. त्यापलीकडे, आम्हाला आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही..."

अमृता-हिमांशु यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले, "हो, अमृता आणि हिमांशु गेल्या दीड वर्षांपासून वेगळे राहत आहेत, पण कायदेशीररीत्या वेगळे होण्याबाबत किंवा घटस्फोटाबाबत त्यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांची मैत्री अजूनही घट्ट आहे आणि ते नियमित संपर्कात राहून वैयक्तिक तसेच कामाच्या गोष्टींवर चर्चा करतात. आर्थिक बाबी, करिअर आणि आपापल्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या अशा विविध कारणांमुळे त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. या परिस्थितीचा विचार करता, सध्याच्या घडीला स्वतंत्र घरात राहणे अधिक व्यावहारिक ठरेल असे त्यांना वाटले. सध्या ते स्वतःसाठी काय योग्य आहे हे ठरवण्यासाठी वेळ घेत आहेत. भविष्यात ते पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतील की कायदेशीररीत्या वेगळे होतील, हे केवळ तेच कालांतराने ठरवू शकतील."

अमृता-हिमांशु लव्ह स्टोरी - करिअर

अमृता आणि हिमांशु यांची भेट २००४ मध्ये 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज'च्या सेटवर झाली आणि ते प्रेमात पडले. या जोडप्याने २०१५ मध्ये 'नच बलिये ७' मध्ये सहभाग घेतला होता आणि ते विजेते ठरले होते. अमृता ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. 'अर्जुन', 'साडे माडे तीन', 'आयना का बायना', 'चंद्रमुखी' आणि 'बाजी' यांसारख्या चित्रपटांतून तिने काम केले आहे. तसेच तिने 'फूँक', 'हिम्मतवाला' आणि 'राझी' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर, हिमांशुने 'भागोनवाली - बांटें अपनी तकदीर', 'लव्ह मॅरेज या अरेंज्ड मॅरेज' आणि 'चिकू की मम्मी दूर केई' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 'वजह तुम हो', 'शेरशाह' आणि 'केसरी वीर' या चित्रपटातही तो झळकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT