Alka Kubal News  Saam tv
मनोरंजन बातम्या

Alka Kubal : 'आजपासून...'; धाकट्या लेकीची यशस्वी कामगिरी पाहून आईचा उर आला भरून; अलका कुबल यांची खास पोस्ट चर्चेत

सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी लेकीसाठी खास पोस्ट केली आहे.

Vishal Gangurde

Alka Kubal Instagram Post : मराठी सिनेमाची किर्ती आता जगभर पोहोचली आहे. जगातील अनेक देशात मराठी सिनेमे पाहिले जातात. मराठी सिनेमातील अभिनेत्रींनी त्याची छाप जगभरातील चाहत्यांवर पाडली आहे. अभिनेत्री अलका कुबल यांचं नाव घेतल्याशिवाय मराठी सिनेसृष्टी पुढे जाऊ शकत नाही. याच सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी लेकीसाठी खास पोस्ट केली आहे. अलका कुबल यांनी या पोस्टमधून धाकट्या लेकीचं कौतुक केलं आहे. (Latest Marathi News)

अभिनेत्री (Actress) अलका कुबल यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अलका कुबल यांना न महाराष्ट्रात न ओळखणारा सिनेरसिक फार दुर्मिळ असेल. अलका कुबल (Alka Kubal) यांना दोन मुली आहेत. अलका कुबल यांना ईशानी आठल्ये आणि कस्तुरी आठल्ये या दोन पोरी आहेत.

ईशानी आठल्ये ही पायलट आहे. तर धाकटी मुलगी कस्तुरी देखील चांगल्या क्षेत्रात कामगिरी करत आहे. धाकटी मुलगी कस्तुरीने केलेल्या उत्तुंग कामगिरीचे इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट करत कौतुक केले आहे.

अलका कुबल या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अलका कुबल या त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट करत चाहत्यांना अपडेट्स देत असतात.अलका कुबल यांची मोठी मुलगी ईशानीने पायलटचे प्रशिक्षण घेतले आहे. ईशानी सध्या पायलट म्हणून कार्यरत आहे. तर कस्तुरीने देखील चांगल्या क्षेत्रात यश संपादन केलं आहे.

कस्तुरीला डर्मिटोलॉजिस्ट व्हायचं आहे. त्यासाठी कस्तुरीने एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे. तिला नुकतीच डॉक्टरेटची पदवी मिळाली आहे. अलका कुबल यांनी लेकीसाठी पोस्ट करत म्हटले आहे की, 'कस्तुरीने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यशस्वीपणे पास केली. आज पासून DR. Kasturee Athalye... We are very pround of you. best Wishes'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT