Vikram Gokhale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vikram Gokhale : अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत कशी आहे? समोर आली महत्वाची माहिती

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत सध्या गंभीर आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार घेत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vikram Gokhale: जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत सध्या गंभीर आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार घेत आहेत. डॉक्टर आपल्या शर्थीचे प्रयत्न करत असून त्यांच्या तब्येतीची वेळोवेळी रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात येईल अशी माहिती स्वत: डॉक्टरांनी दिलेली आहे. सध्या त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर (Life Support System) ठेवण्यात आले आहे.

विक्रम गोखलेंची तब्येत सध्या क्रिटीकल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचं शरीर उपचाराला साथ देत नाहीये. गोखले यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या चाहत्यांसह डॉक्टरही प्रार्थना करीत आहेत. लवकरच ते बरे होईल, अशी अपेक्षा डॉक्टरांना आहे.

दरम्यान, गोखले यांच्या प्रकृतीबाबत बुधवारी उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. काही प्रसारमाध्यमांनी गोखले यांचं निधन झाल्याची वार्ता देखील दिली होती. त्यानंतर गोखले यांच्या एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. गोखले यांच्या निधनाची वार्ता ही अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

कृपया करुन सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीची खोटी माहिती पसरवू नका, असं आवाहन देखील करण्यात आलं. दरम्यान, आज राजेश दामले यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना गोखले यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती दिली. राजेश दामले म्हणाले. जोपर्यंत रुग्णालय प्रशासनाकडून माहिती येत नाही तो पर्यंत अफवा पसरवु नये. डॉक्टरांचं एक पथक गोखले यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचंही दामले यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: या 3 कारणांमुळे भारताचा दारूण पराभव; सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी सुरू होणार मिसिंग लिंक

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

Health Care : शरीरातील Vitamin D कमी झाल्यावर दिसतील 'ही' लक्षणे, जाणून घ्या उपाय

SCROLL FOR NEXT