Vikram Gokhale Latest News Saam TV
मनोरंजन बातम्या

Vikram Gokhale Health Update: विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, मेडिकल बुलेटिन जारी

आज सकाळी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vikram Gokhale Health Update News: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते पूर्णपणे बरे व्हावेत, यासाठी त्यांचे कुटुंबीय, चाहते प्रार्थना करत आहेत. त्यातच त्यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. आज सकाळी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. गोखलेंच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

'विक्रम गोखले यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. ते डोळेही उघडत आहेत. पुढच्या ४८ तासांत व्हेंटिलेटरची गरज सुद्धा भासणार नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. तसेच रक्तदाब आणि हृदयाची क्रियाही सुरळीत सुरू आहे, ' असे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी याडगीकर यांनी मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितले.

काल विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत गेल्या २४ तासांपासून अनेक चढ-उतार येत होते. गोखलेंच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

विक्रम गोखलेंच्या पत्नींनी केलं होतं आवाहन

'ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, ते व्हेंटिलेटरवर असून अद्याप त्यांचे निधन झालेले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा,' अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

विक्रम गोखलेंना नेमकं काय झालं होतं?

विक्रम गोखले यांना बऱ्याच दिवसापासून मधुमेहाचा त्रास होत होता. त्याच परिस्थितीत त्यांना जलोदर झाल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT