Vaibhav Mangle Post Facebook
मनोरंजन बातम्या

Vaibhav Mangle Post: "फटाके फोडून प्रदुषण करू नका...", वैभव मांगलेंने चाहत्यांना केली कळकळीची विनंती

Vaibhav Mangle News: अभिनेता वैभव मांगलेने कोर्टाच्या निर्णयाचे समर्थन करत पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Vaibhav Mangle

अवघ्या काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला आहे. अशातच उच्च न्यायालयाने हवेच्या पातळीमध्ये घट झाल्यामुळे हायकोर्टाने नवे निर्देश जारी केले आहेत. हवेची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे उच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये मुंबईसह राज्यातल्या नागरिकांना फक्त तीन तासच फटाके फोडण्यासाठी मुभा दिली आहे. या निर्णयाला सोशल मीडियावर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेता वैभव मांगलेने कोर्टाच्या निर्णयाचे समर्थन करत पोस्ट शेअर केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिनेता वैभव मांगलेने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. “कळकळीची विनंती..... मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश महानगरातील हवा कमालीची प्रदूषित आहे. कृपया फटाके फोडून ती अधिक प्रदूषित करू नका.” असं म्हणत त्याने फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याच्या या पोस्टला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. (Social Media)

न्यायलयाने दिलेल्या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. हवेचा दर्जा खालावल्यामुळे उच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची मुभा दिली आहे. या निर्णयाचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी पालिका आयुक्त आणि पोलिसांवर असेल.

तीन दिवसांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्याचे आदेश राज्य सरकार आणि पालिका यांना दिले आहेत. जर तसे झाले नाही तर सार्वजनिक आणि खासगी प्रकल्प बंद करण्याचा इशाराही दिला आहे.

हवेचा दर्जा सुधारावा यासाठी न्यायालयाने राज्य सरकारसह अनेक महत्वाच्या महानगरपालिकांना व एमएमआरडीए आयुक्तांना तातडीचे निर्देश दिलेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT