Swapnil Joshi  Instagram @swwapnil_joshi
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Swapnil Joshi : वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया चॉकलेट बॉय स्वप्निलचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

रामायणातील कुश ही भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आज ४६वा वाढदिवस साजरा करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आपल्या अभिनयाने आणि लाघवी स्वभावाने सगळ्यांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे स्वप्निल जोशी. बाल कलाकार म्हणून स्वप्निलने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मालिका, चित्रपट (Movie) आणि वेबसीरीज (Web Series) अशा सर्वच माध्यामातून स्वप्निलने काम केले आहे. मराठी मनोरंजन विश्वातील चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वप्नील जोशीचा आज ४६वा वाढदिवस आहे.

१८ ऑक्टोबर, १९७७ रोजी मुंबईमध्ये स्वप्निलचा जन्म झाला. वयाच्या ९व्या वर्षीपासून स्वप्निलने अभिनयाला सुरूवात केली. रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या रामायणातील कुश ही त्याची पहिली भूमिका होती. त्यानंतर १९९३ साली रामानंद सागर यांच्या 'श्रीकृष्ण' मालिकेत साकारलेल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे स्वप्निल घराघरात पोहचाल. स्वप्निलला या भूमिकेमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

स्वप्निलचे बालपण चाळीत गेले. चाळीत साजरे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा त्याच्या जीवनावर मोठा परिणाम झाला. स्वप्निलला गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात स्वप्निल सहभागी व्हायचा. यामुळे त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली.

२००८ साली प्रदर्शित झालेल्या 'चेकमेट' या चित्रपट (Film) तो पहिल्यांदा प्रमुख भूमिकेत दिसला. मुंबई-पुणे-मुंबई, एका लग्नाची दुसरी गोष्ट, मंगलाष्टका वन्स मोर, मितवा, तू हि रे या चित्रपटातून त्याने रोमँटिक भूमिका साकारल्या. दुनियादारी चित्रपटातील श्रेयस या पात्राने तरुणांना आपलंस केले.

स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) याने अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटामध्ये सुद्धा काम केले आहे. नाना पाटेकर यांच्या 'मुस्तफा' चित्रपटामध्ये स्वप्निलने प्रमुख भूमिका साकारली होती. 'तू तू मैं मैं', पापड पोल या हिंदी मालिकेत स्वप्निलने काम केले. त्याची समांतर या वेबसीरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

स्वप्निलने २०११ साली पेशाने डेंटिस्ट असलेल्या लीनाशी लग्न केले. त्या दोघांना मायरा आणि राघव अशी दोन मुले आहेत. स्वप्निल सध्या 'तेव्हा तू तशी' या लोकप्रिय मालिकेतून (TV Program) आपल्या भेटीला येत असतो. तसेच स्वप्निल 'फू बाई फू'चा परीक्षक देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : डाएट, व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? 'या' चुका आहेत कारणीभूत

Maharashtra News Live Update: नागपुरात उद्या शांतता मार्च, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सिजेपी देशभरात रस्त्यावर उतरणार

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! वऱ्हाडाच्या बसची कंटेनरला धडक; १० ते १२ प्रवासी गंभीर, पाहा VIDEO

Ramesh Mhatre : मोठी बातमी! नगरसेवक रमेश म्हात्रेंना कोर्टाचा दणका, शरण येण्याचे आदेश

High blood pressure: हाय बीपीचा त्रास एका रात्रीत होत नाही; शरीरात दिसतं हे 1 सायलेंट लक्षण

SCROLL FOR NEXT