Siddharth Chandekar Mother  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Siddharth Chandekar Mother : वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्या साथीदाराची गरज का पडली? सिद्धार्थ चांदेकरची आई म्हणाली...

Seema Chandekar : लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आपल्या अभिनयाने कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. गेल्यावर्षी त्यांने आपल्या आईच दुसरं लग्न लावून दिलं आहे.

Shreya Maskar

सिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयामुळे त्यांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तो स्पष्ट वक्ता अभिनेता आहे. सिद्धार्थ चांदेकरने आपल्या आईचं लग्न वयाच्या 57 व्या वर्षी लावून दिलं. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सीमा चांदेकर यांच लग्न पार पडलं. त्याच्या लग्नामुळे अनेकांना आनंद झाला. सिद्धार्थ आणि त्याच्या आईच सर्वत्र कौतुक देखील झाल. मात्र अनेकांनी त्यांना एवढ्या वयात पुन्हा लग्न केल्यामुळे ट्रोल केलं.

सिद्धार्थ चांदेकरची आई म्हणजे अभिनेत्री सीमा चांदेकर (Seema Chandekar) यांनी एका मुलाखतीत आपल्या लग्नासंबंधित काही खुलासे केले आहेत. त्यांच्या पुन्हा लग्न करण्यावर प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, " मला पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घ्यायला खूप वर्ष लागली आहेत. मुलं सेटल झाली म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला नाही. कारण ती लोक माझ्याबरोबरच होते. मला कधीच एकटं वाटल नाही." त्यापुढे म्हणाल्या की, ३ वर्षांपूर्वी माझा अपघात झाला आणि उजव्या हातात प्लेट होती. त्यामुळे मला बाहेर जाण्यासाठी देखील त्रास होयचा. एका वेळेनंतर आपल्याला कोणाची तरी साथ लागते.

अपघात झाल्यामुळे मला एकटं वाटू लागलं होतं. मला काही गोष्टी शेअर करायच्या असतील किंवा काही गप्पा मारायच्या असतील तर मी प्रत्येकवेळेस मुलांना सांगू शकत नाही. मला त्रास होतोय तसेच आम्ही मैत्रिणी भेटलो हे सर्व मी सिद्धार्थला नाही सांगू शकतं. मुलं सर्व ऐकतात पण आपल्यालाही समजलं पाहिजे. त्याच्याकडे तेवढा वेळ नाही. असं मला हळूहळू जाणवायला लागलं. त्यामुळे आयुष्याच्या पुढच्या वळणावर कोणतरी आपल्याला हव असं वाटू लागलं. हा निर्णय घेणे सोप नव्हत पण तरी मी हा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, आज खरेदीचा 'गोल्डन चान्स'; 18K, 22K आणि 24K चे दर किती?

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Solapur : नवऱ्याने बायकोला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, एकांतात बोलायचे सांगून खोलीत नेलं, नंतर...

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ कसं जायचं? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

SCROLL FOR NEXT