Shraddha Thik
काही दिवसांपूर्वी मराठातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या आईचे थाटामाटात दुसरे लग्न लावून दिले होते.
सिद्धार्थच्या या कृत्याचे अनेकांनी प्रचंड कौतुक केले होते. आणि आता सिद्धार्थच्या मागोमाग अजून एका अभिनेत्रीने लावले तिच्या आईचे दुसऱ्यांदा लग्न.
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील अमृता फडके हिने मानसी वहिनीची भूमिका साकारली होती.
अमृताची आई स्मिता फडके यांचे शिरीष केळकरांसोबत लग्नगाठ बांधली. शिरीष केळकर हे व्यवसायाने CA असून, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.
अमृताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या आईला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता म्हणते 'खूप वर्षांपासून बाबा म्हणून हाक मारायला आणि ती जागा घ्यायला कोणीतरी असावं अशी मनापासूनची इच्छा होती.'
'बाबा तुझ्यामुळे मला प्रेम करायला अजून एक गोड भाऊ आणि एक सुंदर बहीण मिळालीये. मनानी खूप श्रीमंत असलेल्या खूप मोठया कुटुंबाचा मीही तुझ्यामुळे एक छोटासा भाग झालीये.' असे अभिनेत्री म्हणते.