Shreyas Talpade
Shreyas Talpade Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेनं मागितली माफी; १० वर्षांपूर्वीच्या सिनेमातील 'त्या' सीनमुळं झाला होता ट्रोल

Chetan Bodke

Shreyas Talpade Trolled: श्रेयस तळपदेने नुकतेच कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात श्रेयस पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी श्रेयसने एक अप्रतिम परिवर्तन केले आहे, ज्यामुळे तो चर्चेतही आला आहे. पण यावेळी त्याच्यासोबत अशी घटना घडली, ज्यामुळे श्रेयस पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे. श्रेयसचा दहा वर्ष जुन्या असलेल्या चित्रपटातील एक सीन सध्या व्हायरल होत आहे. त्या सीनमध्ये श्रेयस धार्मिक भावना दुखावताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. युजर्सनी त्याचे खूप ऐकले, त्यानंतर त्याला माफीही मागावी लागली. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे प्रकरण...

2012 मध्ये श्रेयसचा 'कमल धमाल मालामाल' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रेयसने कॅथलिक व्यक्तीची भूमिका साकारली होती. व्हायरल सीनमध्ये, श्रेयसने नाना पाटेकरांना जाण्यासाठी एका टेम्पोला समोरुन जोरात लाथ मारुन त्याला थांबवले. पण आता तब्बल अनेक वर्षांनंतर नेटकऱ्यांची नजर त्या टेम्पोवर असलेल्या ओम या चिन्हावर गेली आहे. श्रेयसने तिथे लाथ मारून तो टेम्पो थांबवला. सीनमध्ये श्रेयसच्या गळ्यात येशूचे लॉकेटही दिसत आहे.

हा सीन शेअर करत अनेक यूजर्स म्हणतात, श्रेयसने कॅथलिक पात्राची भूमिका साकारत ओमच्या प्रतिकाचा अपमान केला आहे. यामुळे तो ट्रोलच्या निशाण्यावर आला होता. युजर्सनी हा व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली. श्रेयसवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रकरण तापत असल्याचे पाहून श्रेयसनेही उशीर केला नाही, त्याने लगेचच सर्वांची माफी मागितली.

श्रेयस ट्विट करत म्हणतो, "शूटिंगदरम्यान अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. एखाद्या दृश्यादरम्यान एखाद्याच्या वृत्तीप्रमाणे, विशेषतः अॅक्शन सीन. संचालकांच्या मागण्या, वक्तशीरपणा आणि इतर अनेक घटक. मी एवढेच म्हणेन की हे पूर्णपणे अनावधानाने घडले. मी मनापासून माफी मागतो. मी त्यात लक्ष घालून दिग्दर्शकाला सांगायला हवे होते. तथापि, मी हेतुपुरस्सर कोणालाही दुखावणार नाही किंवा असे काहीही पुन्हा करणार नाही. क्षमा असावी!"

श्रेयस तळपदेचा माफीनामाही युजर्सने स्वीकारल्याचे दिसत आहे. कमेंट करून यूजर्स त्याला एक चांगला व्यक्ती म्हणत आहेत तर त्याची प्रशंसाही करत आहेत. यूजर्स म्हणतात, श्रेयसकडून इतरांच्या भावनांचा आदर करायला शिकले पाहिजे. त्याने लगेचच माफी मागितली. श्रेयस शेवटचा 'कौण प्रवीण तांबे?' या चित्रपटात दिसला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : दामोदर पार्कपासून नरेंद्र मोदींच्या रोड शोची होणार सुरुवात

Maharashtra Weather Update: पुढच्या ४८ तासांत या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

PM Narendra Modi : प्रफुल पटेलांनी PM नरेंद्र मोदींना घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटलं तोडं

Special Story: गॅस भरायला पंपावर गेले आणि एका क्षणात सगळं संपलं! घाटकोपर दुर्घटनेनं नालासोपाऱ्याचं कुटुंब पोरकं केलं

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, नेमकं काय आहे प्रकरण?|Ravindra Dhangekar

SCROLL FOR NEXT