Shiv Thakare And Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare: शिव ठाकरेचे सलमान खान बद्दलचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत,“सलमान यांची इमेज रियल लाइफमध्ये...”

शिवचं आणि घरातील मंडळींच नातं सर्वश्रुत आहे. सोबतच सलमान खान सोबतच नातं ही एकदम खास आहे.

Chetan Bodke

Shiv Thakare And Salman Khan: हिंदी टेलिव्हिजनमध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या शोची अर्थात ‘बिग बॉस १६’ ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. जितका हा शो सर्वत्र चर्चेत आहे, त्याहून अधिक त्यातील स्पर्धक चर्चेत आहे. यंदाच्या बिग बॉस १६’ मध्ये शिव ठाकरे हा मराठमोळा स्पर्धक सर्वांच्याच चर्चेचा विषय राहिला.

शिवचं आणि घरातील मंडळींच नातं सर्वश्रुत आहे. सोबतच सलमान खान सोबतच नातं ही एकदम खास आहे. नुकतंच शिव ठाकरेने बॉलिवूड अभिनेता सलमान खानबद्दल भाष्य केले आहे. ते सध्या बरेच चर्चेत आले आहे.

नुकतंच शिवने ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या संकेस्थळाला मुलाखत दिली. यावेळी त्याला सलमान खानबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावर त्याने फार मजेशीरपद्धतीने उत्तर दिले. शिव म्हणतो, “मी माझी फिटनेस सलमान खानला बघून केली आहे. मला ते नेहमीच माणूस म्हणून आणि एक अभिनेता म्हणून नेहमीच आवडतात. त्यांच्या अनुभवाच्या बाबतीत मी फारच लहान आहे. सलमान खान यांची इमेज रियल लाइफमध्ये फार वेगळी आहे. ते कॅमेऱ्यासमोर जितके आपल्याला समजवतात, त्याहून अधिक आणि त्याहून चांगलं ते रियल लाइफमध्ये आपल्याला समजवतात.”

“सलमान खानबद्दल जितका मला आदर आहे, तितकीच मला त्यांची भीतीही आहे. ‘बिग बॉस १६’ च्या वेळी मी नेहमीच अशी प्रार्थना करायचो की, त्यांनी आमची आज शाळा घेऊ नये. वीकेंड वेळी मी नेहमी फिंगर क्रॉस करून बसायचो. मी जेव्हा ‘बिग बॉस १६’च्या घरात होतो तेव्हा ही मला त्यांची भीती वाटायची आणि आजही त्यांची भीती वाटते.”

शिव ठाकरे ‘बिग बॉस १६’च्या घरात टॉप ५ मधील स्पर्धक होता. फिनालेवेळी त्याची सर्वत्र विजेता म्हणून सर्वत्र चर्चा होती. पण शिवला उपविजेता पदावरच समाधान मानून घ्यावे लागले. शिव मराठी बिग बॉस सोबतच रोडीज मध्येही स्पर्धक म्हणून होता. यापूर्वी शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी २’ चा विजेता ही झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जगातील सर्वाधिक तलाव असलेला देश कोणता? जाणून घ्या सविस्तर रंजक माहिती

Maharashtra Live News Update: दहावी बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यास सुरुवात, ६ ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांना मुदत

Samruddhi Kelkar: जरतारी काठ, नऊवारी थाट, मोगर गजरा साजे केसात...

Rahul Gandhi PC Highlights: मतचोरीचे अ‍ॅडिशन- डिलीशन पुराव्यासह दाखवले, राहुल गांधींचे 10 गंभीर आरोप

Pune : पुणे रिंग रोडबाबत मोठी अपडेट, प्रकल्पाचा Phase 1 अंतिम टप्प्यात, PMRDA शेतकऱ्यांना भरपाई देणार

SCROLL FOR NEXT