Sayaji Shinde SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sayaji Shinde : पैसा नको फक्त मैत्री टिकली पाहिजे, सयाजी शिंदेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Sayaji Shinde Viral Video: सध्या मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते मित्रासोबत शेतात फिरताना दिसत आहेत.

Shreya Maskar

मराठी अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी आणि साऊथ चित्रपटात काम केले आहे. त्यांनी अनेक दमदार नाटक देखील केली आहेत. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सयाजी शिंदे हे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहीले आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता सयाजी शिंदेंनी इंस्टाग्रावर अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सयाजी शिंदे आपल्या बालपणीच्या मित्रासोबत निवांत वेळ घालताना पाहायला मिळत आहे. ते एकत्र शेतात फिरताना, नदी जवळ छान वेळ घालताना पाहायला मिळत आहे. तसेच व्हिडीओमध्ये ते धबधब्याखाली चिंब भिजताना देखील पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे ते रिसॉर्टच्या पूलमध्ये आपल्या मित्रासोबत धमाल मस्ती करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये या दोघांच्या विमानाच्या प्रवासाची झलक देखील पाहायला मिळत आहे. एकंदर हा व्हिडीओ सयाजी शिंदे यांनी आपल्या लहानपणीच्या मित्रासोबतच्या आनंदी क्षणांचा आहे. या व्हिडीओला त्यांनी खास गाणे देखील लावले आहे. पार्श्वभूमी 'तू है वही दिल ने जिसे अपना कहा' हे गाणे वाजत आहे. लहानपणापासूनची त्यांची ही मैत्री सयाजी शिंदे यांच्यासाठी खूप खास आहे.

सयाजी शिंदे यांनी या व्हिडीओला खूप खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "पैसा नकोय प्रेम पाहिजे, लाखो येतील लाखो जातील, मैत्री टिकून राहिली पाहिजे" त्यांच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स आणि प्रेमाचा पाऊस पडत आहे. सयाजी शिंदे यांच्या करिअरची सुरुवात देखील गावातूनच झाली होती. ते सातारा जिल्ह्यात राहायचे. त्यांचे मातीशी घट्ट नाते जोडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पार्थ राज्यसभेवर? 'वर्षा'वर खलबतं, दीड तासात नेमकं काय ठरलं?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला; दगडफेक करून तस्कर फरार

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

बोटं कापली, डोकं ठेचलं, गळा चिरला अन्...; बारावीतील तरुणीसोबत जे घडलं त्यानं गाव हादरलं

सुनेत्रा अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाला होकार? अरोरा निरोप घेऊन मुंबईला रवाना, बैठकीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT