Santosh Juvekar Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Santosh Juvekar Post : संतोष जुवेकरचा फोटो थेट हेअर सलूनच्या बोर्डावर, अभिनेत्याने सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा

Santosh Juvekar Post : नेहमीच आपल्या उत्तम अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या संतोष जुवेकरच्या पोस्टच्या माध्यमातून त्याने बालपणीची एक आठवण सांगितली आहे.

Chetan Bodke

Santosh Juvekar Post

अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी भन्नाट पोस्ट करत असतो. 'स्ट्रगलर साला' या वेबसीरीजच्या माध्यमातून संतोष जुवेकर कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. नेहमीच आपल्या उत्तम अभिनयासाठी चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्याने पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्याने, त्याच्या बालपणीची एक आठवण सांगितली आहे.

संतोष जुवेकर बालपणीचा किस्सा सांगताना म्हणाला, "लहानपणी बाबा सलूनमध्ये केस कापायला घेऊन जायचे. तेव्हां केसकपणारे उत्तम काका मला त्यांच्या दुकानातल्या भिंतीवर लावलेल्या अनेक हिरोंचे फोटो दाखवून विचारायचे "बाळा बोल कुणासारखे कापू केस तुझे.... अमिताभ बच्चन सारखे की मिथुन सारखे की अनिल कपूर सारखे की शारुख खान सारखे की सलमान खान सारखे..." आणि मग त्यातला मी एक फोटो निवडायचो आणि सांगायचो... पण ते कापायचे तसेच जसे बाबा त्यांना सांगायचे तसेच..." (Social Media)

पुढे अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "असो हे महत्वाचं नाही तर सांगायचं कारण हे की काल शुटिंगला जाताना अचानक मला रस्त्यात एक हेयर सलून दिसलं. त्याच्या नावाच्या बोर्डवर चक्क माझा फोटो लावला होता. त्या भावानं आता बहुतेक पोर दुकानात जाताना बाहेरच ठरवत असतील कुणासारखे केस कापायचे ते... ये बाप्पू... साल्ला अपून तो हिरो बनगया!!!! बोला तो बोला जय महाराष्ट्र " (Marathi Actors)

सध्या अभिनेत्याची ही इन्स्टाग्राम पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. "मराठीतला इम्रान हाशमी...", "मराठी हिरोंचे फोटो क्वचितच ठेवत असतील. पण भारी वाटलं संत्या भाईचा फोटो बघून...", "दादा, तू लोकांच्या मनात किती घर केलं आहेस, हे तेव्हा कळतं जेव्हा बॅनरवर बाकी हिरोंची नावं पाहतो, मात्र तुझी ओळख ही, "तुमचा आमचा लाडका संत्या" अशी असते..." असं म्हणत अनेक युजर्सने संतोषचे कौतुक केले आहे. चाहत्यांसोबत अभिनेत्याचे काही सेलिब्रिटी मित्रांनीही अभिनेत्याचे कौतुक केले आहे. पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT