Famous Actor saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor : प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला पितृशोक, सामाजिक अन् मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actor Father Death : मराठी प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडीलांचे निधन झाले आहे. वडीलांचे मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रात मोठे नाव आहे. नेमकं काय झालं, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अभिनेत्याच्या वडीलांचे निधन झाले.

अभिनेत्याच्या वडीलांचे मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्राशी खास कनेक्शन आहे.

मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुष्कर श्रोत्रीच्या वडीलांचे सुधाकर श्रोत्री यांचे निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुधाकर श्रोत्री कला, साहित्य, मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्याचे मनोरंजन क्षेत्रात मोलाचे योगदान आहे.

सुधाकर श्रोत्री यांनी मुंबईत आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सुधाकर श्रोत्री यांची वृत्तपत्र वितरण क्षेत्रात मोठी ओळख होती. रविवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. सुधाकर श्रोत्री यांच्या पश्चात त्यांची मुलं, सुना आणि नातवंडं असा परिवार आहे. सुधाकर श्रोत्री यांनी तब्बल 65 वर्ष वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत काम केले आहे. ते शांत स्वभावाचे, सर्वांना सांभाळून घेणारे होते.

सुधाकर श्रोत्री यांना साहित्याची आवड होती. सुधाकर श्रोत्री यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. यात 'वडिलोपार्जित', 'लेडीज स्पेशल' आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यावर आधारित 'खास सचिन' या कविता संग्रहांचा समावेश आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (2 मार्च 2026) ला सकाळी 8 वाजता विलेपार्ले येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्कर श्रोत्री वर्कफ्रंट

पुष्कर श्रोत्रीने आजवर मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. पुष्करच्या जडणघडणीवर त्याच्या वडीलांच्या मोठा हात आहे. पुष्कर श्रोत्री उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता आहे. पुष्कर श्रोत्रीचे सध्या 'लाभले आम्हास भाग्य' आणि 'श्शssss घाबरायचं नाही' ही दोन नाटक पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : 7 नोव्हेंबरला ग्रहांची मोठी चाल! मेष ते मीन, कोणाचं नशीब चमकणार? वाचा आजचे राशिभविष्य

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; उसाला प्रतिटन 4200 रुपये दर मिळणार

सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांना शह? 'गोकुळ'नंतर जिल्हा बँकेतही भाजपची तिरकी चालl; माजी खासदाराला गळाला लावण्याचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT