Pushkar Shrotri Work Saam Tv
मनोरंजन बातम्या

लोकप्रिय अभिनेता असला तरी पैसै कमावण्यासाठी Pushkar Shrotri करायचा 'हे' काम

पुष्कर श्रोत्रीने अनेक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये त्याने हजेरी लावली होती.

Chetan Bodke

Patla Tar Ghya With Jayanti: सेलिब्रिटी आणि चाहत्यांच्या नाते फार अनोखे असते. कलाकारांच्या खासगी आयुष्यात सध्या काय सुरु आहे, याची माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक चाहते बरेच उत्सुक असतात. फावल्या वेळात आपले लाडके सेलिब्रिटी काय करतात असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. या आणि अशा अनेक प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेला पुष्कर श्रोत्रीने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.

पुष्कर श्रोत्रीने याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये त्याने हजेरी लावली होती. पुष्कर फावल्या वेळात काय करत असेल अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला पडले असतील. त्याने यावेळी सांगितले की, 'मी फावल्या वेळेत रिक्षा चालवून पैसे कमवायचो.' आता तो असं का करायचा, यामागचं मुख्य कारण काय? याचे उत्तर तुम्हाला शुक्रवारी म्हणजेच १७ फेब्रुवारी रोजी मिळणार आहे.

यावेळी या शोमध्ये पुष्कर श्रोत्रीसोबत संदीप पाठकने ही हजेरी लावली होती. ‘आपल्या देशाचं कालचं, आजचं आणि उद्याचं राजकारणही रस्ते देऊ, पाणी देऊ आणि वीज देऊ याभोवतीच फिरणार आहे. यातून आपण कधी बाहेर पडणार आहोत?' असा प्रश्न या शोमध्ये संदीप पाठक यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या आगामी एपिसोडमध्ये थोडी गांभीर्यता दिसणार आहे.

या भागात पुष्कर आणि संदीप यांनी त्यांच्या कारकिर्दीतील काही धमाल किस्से शेअर केले आहेत. सोबतच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरही आपली परखड मतं व्यक्त केली आहेत. त्यामुळे यावेळचा 'पटलं तर घ्या विथ जयंती'चा भाग जबरदस्त असणार हे नक्की !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coffee Intake: कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही? मग जाणून घ्या दिवसाला किती कप कॉफी प्यावी

Maharashtra News Live Update: भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला सदस्यावर जीवघेणा हल्ला

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT