Prithvik Pratap First Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prithvik Pratap: 'प्रयत्न प्रामाणिक असतील तर...', पृथ्वीक प्रतापची पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी खास पोस्ट

Prithvik Pratap First Movie: पृथ्वीक प्रतापचा पहिलाच चित्रपट डिलिव्हरी बॉय प्रेक्षकांच्या भेटीला आला. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Priya More

Delivery Boy Movie:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya Jatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा अभिनेता पृथ्वीक प्रतापने (Prithvik Pratap) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकताच Prithvik Pratap First Movie: पृथ्वीक प्रतापचा पहिलाच चित्रपट डिलिव्हरी बॉय प्रेक्षकांच्या भेटीला आला. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पृथ्वीक प्रतापने 'डिलिव्हरी बॉय' (Delivery Boy Movie) या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. मोहसीन खान दिग्दर्शित चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील हे मुख्य भूमिकेमध्ये आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. हा पृथ्वीकचा पहिलाच चित्रपट असल्यामुळे त्याने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून पृथ्वीकने या चित्रपटाला भरभरून प्रेम द्या अशी विनंती चाहत्यांना केली आहे.

पृथ्वीकने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'आपलं आयुष्य एक कथा आहे… त्याला सुरुवात आहे, मध्य आहे आणि त्याला शेवटसुद्धा आहे. फक्त स्वतःवर आणि पटकथेवर विश्वास ठेवून मेहनत केली की आयुष्याचा सिनेमा नशीबाच्या बॅाक्स ॲाफिसवर चालतो म्हणजे चालतोच. आज माझ्या आयुष्याची पटकथा महत्त्वाचं वळण घेतेय, रुपेरी पडद्यावर इतरांना पाहत मोठा झालो आणि आज मी स्वतः त्या रुपेरी पडद्याचा भाग झालोय.'

पृथ्वीकने पुढे लिहिले की, 'आमचा सिनेमा ‘डिलीवरी बॅाय’ आज संपूर्ण महाराष्ट्रात रीलीज होतोय. हा सिनेमा तुम्ही थिएटरला जाऊन पाहा… त्याच्यावर भरभरून प्रेम करा… २०० स्क्रीन आणि ६०० शोज तुमची वाट पाहतायत… तुम्ही प्रेक्षक माझ्या या सुद्धा कलाकृतीवर भरभरून प्रेम कराल याची मला खात्री आहे. कारण एक गोष्ट मला कळलीये… प्रयत्न प्रामाणिक असतील आणि त्याला मेहनतीची जोड असेल तर… आपल्या आयुष्याच्या सिनेमाला Happy Ending च असणार. आजपासून तुम्ही आमच्या ‘Delivery Boy’ बाळाचे मायबाप!', असे म्हणत त्याने चित्रपटावर भरभरुन प्रेम करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

SCROLL FOR NEXT